आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : आलिया-सिद्धार्थने केले यशाचे सेलिब्रिशेन, लेट नाइट पार्टी केली एन्जॉय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा)

मुंबई - अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या खूप आनंदी आहे. या आनंदाचे कारण म्हणजे अलीकडेच रिलीज झालेल्या दोघांच्याही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला आहे. आलिया भट्टचा 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर गाजतोय. तर सिद्धार्थची प्रमुख भूमिका असलेल्या 'एक व्हिलन' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींपेक्षा जास्तचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे आलिया आणि सिद्धार्थसह निर्माता करण जोहरसुद्धा सध्या पार्टीच्या मूडमध्ये आहे.
मंगळवारी उशीरा रात्री हे तिघांनीही एकत्र डिनर पार्टी एन्जॉय केली. त्यापूर्वी हे तिघेही व्होग ब्युटी अवॉर्ड सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्यातून हे तिघेही थेट एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पोहोचले. हॉटेलमधून बाहेर पडताना या तिघांची झलक फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमे-यात कैद केली. यावेळी आलिया खूप कूल दिसली. आलियाच्या हाताच्या बोटात यावेळी हटके डिझाइनची अंगठी दिसली. तर सिद्धार्थ आणि करण फॉर्मल लूकमध्ये दिसले.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सेलेब्सचा क्लिक करण्यात आलेला वेगवेगळा अंदाज...