आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Alia, Varun At Jabong Promotional And Tiger Shroff Spotted

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: प्रायव्हेट इव्हेंटमध्ये पोहोचले आलिया-वरुण, टायगर दिसला फिल्मिस्तानच्या बाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आलिया भट्ट आणि वरुण धवन
मुंबई- वरूण धवन आणि आलिया भट्ट आपला आगामी सिनेमा 'हम्टी शर्मा की दुल्हनिया'च्या प्रमोशनसाठी जोरदार मेहनत करत आहेत. सिनेमाच्या प्रमोशनसाठी हे दोघे एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आलिया-वरूण डेनिम लूकमध्ये दिसले. आलिया पांढरा टॉप, निळी जीन्स आणि काळे शूज घातले होते, तेच वरूण पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि रेड लेदर शूजमध्ये शोभून दिसत होता. दोघांनी कार्यक्रमांला उपस्थित असलेल्या तरूणांसोबत डान्स केला. 'हम्टी शर्मा की दुल्हनिया' 11 जुलैला प्रदर्शित होणार आहे. शशांक खेतान याने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
टायगर श्रॉफ
'हिरोपंती'मधून बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअरला सुरूवात करणारा अभिनेता टायगर श्रॉफ शुक्रवारी फिल्मीस्तानमध्ये दिसला. नेहमी साध्या लूकमध्ये दिसणारा टायगर डार्क ग्रे टी-शर्ट आणि ब्लॅक लोअरमध्ये दिसला. यादरम्यान टायगरच्या चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढले.
पुढच्या स्लाइडवर पहा या सर्व स्टार्सचे फोटोज्...