आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या चाहत्यासह वरुण आलियाचा दिसला New Look, पाहा 10 छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता वरुण धवन छोट्या चाहत्यासह
मुंबई: वरुण धवन आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. दोन्ही स्टार्स बुधवारी (2 जुलै) मुंबईच्या हार्ड कौर रॉक कॅफेमध्ये दिसले. तिथे त्यांनी सिनेमासह फिफा वर्ल्ड कपचेही प्रमोशन केले.
वरुण यादरम्यान एका छोट्या चाहत्यासह दिसला. त्याने निळ्या रंगाची जीन्स आणि काळ्या रंगाची टी-शर्ट परिधान करून पिवळ्या रंगाचे जॅकेट घातलेले होते. दुसरीकडे आलिया काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. तिने काळ्या रंगाची जीन्ससह त्याच रंगाचे टॉप घातलेले होते. प्रमोशनदरम्यान दोघेही डिफरंट लूकमध्ये दिसत होते.
'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया'मध्ये वरुण धवनच्या पात्राचे नाव हम्प्टी शर्मा असून तो एका क्रिकेट चाहता असतो. तसेच आलिया भट्टच्या काव्या प्रतापची भूमिका साकारत आहे. ती सिनेमा प्रेमी असते. ती करीना कपूरची मोठी चाहती असते. सिनेमा करण जोहर निर्मित करत असून शशांक खेतान दिग्दर्शित करत आहे. 11 जुलै 2014 रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आलिया-वरुणचे प्रमोशनदरम्यानची छायाचित्रे...