परिणीति चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट
मुंबई - मुंबईस्थित सनी सुपर साऊंडमध्ये अलीकडेच 'एक व्हिलन' या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला बी टाऊनमधील अनेक सेलेब्सनी हजेरी लावली होती. यावेळी सिनेमात मेन लीडमध्ये असलेले सिद्धार्थ मल्होत्रा आणि श्रद्धा कपूर दिग्दर्शक मोहित सुरीसोबत दिसले.
स्क्रिनिंगला ड्रेस डिजाइनर मनीष मल्होत्रा, दिग्दर्शक-निर्माता करण जोहर, करणची आई हीरू जोहर, अभिनेत्री आलिया भट्ट, दिग्दर्शक अयान मुखर्जी, अभिनेत्री
परिणीती चोप्रा, निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर, अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरी, अभिनेता शाहिद कपूर, अभिनेता वरुण धवन, दिग्दर्शक पुनीत मल्होत्रासह बरेच सेलेब्स आले होते.
'एक व्हिलन' हा सिनेमा 'आय सॉ द डेव्हिल' या कोरिअल सिनेमावर आधारित असून 27 जून रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. आतापर्यंत विनोदी भूमिकेत झळकलेला अभिनेता रितेश देशमुख या सिनेमात नवीन रुपात दिसला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची एक झलक...