आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अलोन' असेल बिपाशा बसूचा सर्वात बोल्ड सिनेमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज आणि 'राज 3'सारख्या हॉरर सिनेमांमध्ये यशस्वी ठरलेली बिपाशा बसूचे याच जॉनरचे 'आत्मा' आणि 'क्रिएचर 3डी' सिनेमे फ्लॉप ठरले. आता ती एक आणखी एका हॉरर 'अलोन' नावाच्या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा तिच्यासाठी आर या पारची परिस्थिती तयार करू शकतो.
जर मागील तीन सिनेमांप्रमाणेच हा सिनेमासुध्दा फ्लॉप झाला तर तिला सिनेमा व्यवसायाला अलविदा म्हणण्याशिवाय पर्याय उरणार नाही. असे होऊ नये म्हणूण बिपाशा या सिनेमाच्या मार्केटींगसाठी मेहनत घेणार आहे. हा सिनेमा 2007मध्ये थायलँडमध्ये तयार झालेल्या याच नावाचा हिंदी रिमेक आहे.
सिनेमाची कहानी दोन बहिणींच्या भोवती गुंफलेली आहे. त्यांचे शरीर जन्मत: जोडलेले आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, हॉररमध्ये दुहेरी भूमिकेचा मसाला कमी पडू नये म्हणून ती अंगप्रदर्शन करताना दिसणार आहे.
यापूर्वी त्यांनी 2003मध्ये रिलीज झालेल्या 'जिस्म' सिनेमात अंगप्रदर्शन केले होते. आगामी सिनेमात तिचा अंदाज आणखी कामूक असणार आहे. सिनेमाच्या निगडीत एका सूत्राने सांगितले, की आपल्या लूक आणि वार्डरोबवर बिपाशा विशेष लक्ष देत आहे.
गोपनीयता जपण्यासाठी सिनेमाचे एक सेटसुध्दा मुंबईमध्ये आणले नाही. पूर्ण शूटिंग केरळमध्ये होत आहे. सिनेमाते दिग्दर्शन भूषण कुमार करत आहे. त्यांनी 'रागिनी एमएमएस 2'मध्ये सनी लिओनला हॉरर आणि इरॉटीक अवतारात सादर केले होते. हा सिनेमा हिट ठरला होता. बिपाशासुध्दा तशाच अवतारात दिसणार आहे. सिनेमात तिचा नायक करण सिंह असणार आहे.
निर्माता कुमार मंगतने सद्यस्थितीत फ्लॉप असलेल्या बिपाशाला जून्या मैत्रीमुळे काम दिले आहे. आता सिनेमा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला रिलीज डेट ठरवली होती, परंतु अर्जुन कपूरच्या 'तेवर'च्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात शिफ्ट झाल्याने निर्माते सिनेमासाठी सुरक्षित तारिख शोधत आहेत. सूत्रांनी शक्यता वर्तवली आहे, की रिलीज डेट 16 किंवा 30 जानेवारी असू शकते. या तारखेला बिपाशाचे भवितव्य ठरू शकते.