आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aveera Khan In Jodhpur For Salman Khan Deer Hunter Case

अर्पिताच्या लग्नानंतर पहिल्यांदाच कोर्टात हजर झाली सलमानची बहीण अलविरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कोर्टाच्या दिशेने जात असताना अलविरा खान)

जोधपूरः बुधवारी अलविरा खान-अग्निहोत्री जोधपूर कोर्टात हजर झाली होती. येथे ती भाऊ सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणाच्या सुनावणीसाठी आली होती. यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर महिन्यात वकील सारस्वत यांना धाकटी बहीण अर्पिताच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी अलविरा आणि सलमान एकत्र जोधपूरमध्ये आले होते. अर्पिताच्या लग्नानंतर येथे येण्याची अलविराची ही पहिलीच वेळ आहे.
वकिलांनी सांगितले, सलमानला येत नाही राग
वकील सारस्वत यांनी सांगितले, की गेल्या सोळा वर्षांपासून हा खटला सुरु आहे. मात्र एवढ्या वर्षांत त्यांनी सलमानला कधीही रागात पाहिले नाही. सलमान त्यांना नेहमी हेच म्हणतो, की तुम्ही प्रयत्न करा न्याय नक्की मिळेल. सलमानची वागणूक सामान्य माणसांप्रमाणेच असते. या खटल्याविषयी त्यांनी कधीही सलमानला तणावात पाहिले नसल्याचे सांगितले. या खटल्याविषयी हस्तीमल यांचे सलमानशी फार कमी बोलणे होते. मात्र त्याचे कुटुंबीय यासंदर्भात त्यांच्याशी संपर्कात असतात. बहीण अलविरा नेहमी याविषयी चौकशी करत असते. त्याचे वडील सलीम आणि आई सलमा यांच्यासोबत सारस्वत यांचे कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जोधपूर कोर्टात जात असतानाची अलविराची छायाचित्रे...