मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलने 9 जून 2014 रोजी आपल्या वयाची 38 वर्षे पूर्ण केली. अमिषाने यंदाचा आपला वाढदिवस प्रभूदेवा आणि रणधीर कपूर यांच्यासोबत साजरा केला. या दोन्ही स्टार्ससह तिने वेगवेगळी बर्थडे पार्टी साजरी केली.
2000मध्ये 'कहो ना प्यार है' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारी अमिषा एका रात्रीत स्टार झाली. मात्र ती आपले स्टारडम टिकवून ठेऊ शकली नाही. मोजके हिट सिनेमे दिल्यानंतर अमिषाची लोकप्रियता कमी झाली. लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी ती बोल्ड फोटोशूटची मदत घेऊ लागली. या फोटोशूटमुळे तिच्यावर टीकासुद्धा झाली.
यावर्षी अमिषाचे 'भैय्याजी सुपरहिट' आणि 'देसी मॅजिक' हे दोन सिनेमे रिलीजच्या मार्गावर आहेत. 'भैय्याजी सुपरहिट' या सिनेमात तिच्यासह सनी देओल, प्रिती झिंटा आणि अर्शद वारसी झळकणार आहेत. तर 'देसी मॅजिक'मध्ये तिच्यासह लिलेट दुबे दिसणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अमिषाचे बर्थडे सेलिब्रेशन...