आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amid The Rumour Of Their Split, Tanisha Mukerjee Celebrates Armaan Kohli’S Dad Birthday Party

PIX: अरमानच्या वडिलांच्या बर्थ डे पार्टीत पोहोचली तनिषा, स्टार्सनी एन्जॉय केली पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बिग बॉस 7'मधील जोडी अरमान कोहली आणि तनिषा मुखर्जी यांच्या ब्रेकअपची बातमी सध्या चर्चेत होती. मात्र ही बातमी केवळ अफवा असल्याचेच सिद्ध झाले आहे. अलीकडेच अरमान कोहलीने त्याचे वडील राजकुमार कोहली यांच्या 85व्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत तनिषा मुखर्जीने आवर्जुन हजेरी लावली आणि राजकुमार कोहली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
या पार्टीत अरमान आणि तनिषा यांचा रोमान्सही उपस्थितांना पाहायला मिळाला. लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याचे समजते. तनिषा यावेळी अरमानच्या आईसोबतही वेळ घालवला.
तनिषाव्यतिरिक्त या पार्टीत रवि किशन, सोहेल खान, एली अवराम, अँडी, वत्सल सेठ, चेतन हंसराज, आदित्य पंचोली, सोनाक्षी सिन्हाची आई पूनम सिन्हा, अविनाश वाघवान, चंकी पांडेसह बरेच सेलिब्रिटी पोहोचले होते. या पार्टीत अँडी आणि एली एकत्र डान्स करताना दिसले. सर्वच सेलिब्रिटींनी ही पार्टी एन्जॉय केली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा या पार्टीची खास छायाचित्रे...