आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amir Became A Tennis Player In His Spare Time, Showed His Sports Love: Pics

PICS : फावल्या वेळेत आमिर बनला टेनिस प्लेअर, दिसली खेळातील रुची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 14 मार्च 2014 रोजी अभिनेता आमिर खानने वयाची 49 वर्षे पूर्ण केली. आपल्या वाढदिवशी आमिरने सांगितले होते, की तो यावर्षी एकही सिनेमा करणार नाही. आता या फावल्या वेळेत आमिर खेळात आपली रुची वाढवताना दिसतोय. आमिर रविवारी कंगना राणावतच्या बर्थ डे पार्टी पत्नी किरण रावसह पोहोचला होता. पार्टीत काही वेळ थांबल्यानंतर आमिर खार येथील जिमखाना येथे पोहोचला आणि टेनिसमध्ये आपला हात आजमावला.
आमिरने या जिमखान्यात आयोजित एका स्पोर्ट्स कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला होता. आमिरसह थ्री इडियट्समधील त्याचा को-स्टार शर्मन जोशी आणि फिल्ममेकर रितेश सिधवानीसुद्धा हजर होते. आमिर आणि शर्मनने येथे तालही धरला होता.
खेळात सहभागी झालेल्या मुलांना आमिरने ऑटोग्राफसुद्धा दिला. येथे उपस्थित लोकांना आमिरचे खेळावरचे प्रेम बघायला मिळले.
आमिरची खेळातील रुची...
आमिर आपल्या बिझी शेड्युलमधून खेळासाठी आवर्जुन वेळ काढत असतो. आमिरला क्रिकेट पसंत आहे. टीम इंडियाचा सामना बघण्यासाठी आमिर आवर्जुन मैदानावर हजर असतो. सचिन तेंडुलकरने ज्या दिवशी संन्यास घेतला त्यादिवशी आमिर त्याची शेवटची टेस्ट बघायला हजर होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मिस्टर परफेक्शनिस्टचा नवा अवतार...