आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलाकारांनाही वाटते महानायक अमिताभ बच्चनची ‘युद्ध’ मालिका तुल्यबळ नाही!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दूरचित्रवाणीवरील सर्वात महागडी मालिका म्हणून ‘युद्ध’ची बरीच जाहिरात करण्यात आली. एक-एका भागासाठी ३ कोटी रुपये खर्च आला. अमिताभसारखे महान कलाकार पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर येणार म्हणून उत्सुकताही होती. साधारण महिनाभर मालिका चालली. वीस भाग प्रसारित झाले आणि मालिका संपली आणि तीपण फ्लॉपचा शिक्का घेऊन.

दैनिक ‘भास्कर’ने मालिकेशी संबंधित अभिनेत्यांशी चर्चा केली तेव्हा मालिकेमागील प्रत्येक कडी कमकुवत होती ही बाब त्यांनी मान्य केली. संपूर्ण जुनी मालिका, अंधार असलेल्या खोलीपर्यंत मर्यादित राहिली. त्यात टेबल-खुर्ची आणि एका बेडशिवाय नवे काही नव्हते. जुन्या गाड्या, अमिताभ आणि त्यांची डॉक्टर पत्नी साधा सूट किंवा जीन्स टॉपमध्ये दिसले.
मालिकेमध्ये सेटसारखी कोणती वस्तू आणि कोणते संगीतही नव्हते. मालिकेत बच्चन यांच्या मित्राची भूमिका बजावणारे झाकीर हुसेन म्हणाले, आम्हाला दिलेले कपडे व्यक्तिरेखेशी अनुकूल नव्हते. मला व्यापार सम्राटाची व्यक्तिरेखा मिळाली होती. मात्र, त्यासाठीचा सूट खूप साधा होता.