आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: सून माझी लाडाची... इव्हेंटमध्ये ऐश्वर्यासोबत दिसली बिग बींची खास बाँडिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सून ऐश्वर्यासोबत अमिताभ बच्चन)
चेन्नईः शनिवारी अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन चेन्नईत होते. येथे दोघेही कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरुमच्या ओपनिंगसाठी आले होते. या इव्हेंटमध्ये अमिताभ आणि ऐश्वर्या यांच्यासह दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन, प्रभू, शिव राजकुमार यांचीही उपस्थिती होती.
या सर्व सेलिब्रिटींमध्ये अमिताभ आणि ऐश्वर्या मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. यावेळी सून आणि सास-यांची खास बाँडिंग उपस्थितांना पाहायला मिळाली. ऐश्वर्याने रोहित बलने डिझाइन केलेला हायनेक अनारकली सलवारसूट परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसली. तर बिग बी दाक्षिणात्य पोशाखात दिसले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा इव्हेंटमध्ये क्लिक झालेली खास छायाचित्रे...