नवी दिल्ली: बॉलिवूचे महानायक
अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावर अभिनय केल्यानंतर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. 'कौन बनेगा करोडपती' या टीव्ही शोनंतर अमिताभ बच्चन यांचा दुसरा टीव्ही शो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा शो नसून मालिका आहे आणि
सोनी चॅनलवर प्रसारित होणार आहे.
'युध्द'ची पूर्ण टीम प्रमोशनसाठी दिल्लीमध्ये पोहोचली होती. यादरम्यान टीमसह अमिताभ बच्चनसुध्दा उपस्थित होते. त्यांनी स्वत: आपल्या मालिकेविषयी माहिती दिली. तसेच शोच्या स्टार्सनीसुध्दा मालिकेविषयी आणि आपल्या पात्राविषयी थोडी-थोडी माहिती दिली. यावेळी अमिताभ यांनी 'युध्द'च्या पोस्टरचे उद्धाटन केले. अनुराग कश्यप, सारिका आणि अहानासुध्दा उपस्थित होती. अनुराग या मालिकेचा कथा लेखक आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहे. या शोचे दिग्दर्शन ऋभु दासगुप्ताने केले आहे.
या कार्यक्रमाची छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा....
फोटो- भूपिंदर सिंह