महानायक
अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हासन हे तिघेही एकापेक्षा एक आहेत. तिघांनाही त्यांचा चाहतावर्ग देव मानतो. अशावेळी हे तिघेही एका मंचावर दिसणार असतील तर.. हे अद्भुत दृश्य मंगळवारी मुंबईतील एका पंचतारांकीत हॅाटेलमध्ये दृष्टीस पडले. निमित्त होते अमिताभ बच्चन यांच्या आगामी 'शमिताभ' या सिनेमाच्या म्युझिक लाँचचे.
या सिनेमात अमिताभ प्रमुख भूमिकेत असून त्यांच्याबरोबर धनुष आणि अक्षरा हासन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. धनुष साउथच्या सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता आणि रजनीकांत हयांचा जावई आहे, तर अक्षरा ही कमल हासन यांची धाकटी मुलगी आहे. एकूणच अमिताभ, रजनीकांत आणि कमल हासन हे तिघेही या सिनेमाशी कोणत्या न कोणत्या संबंधात जोडले गेले आहेत. या म्युझिक लाँच सोहळ्यात कमल हासन पत्नी सारिका आणि थोरली मुलगी श्रुतीसोबत पोहोचले होते.
आर. बाल्की यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून अमिताभ आणि
अभिषेक बच्चन सहनिर्माते आहेत. येत्या 6 फेब्रुवारी 2015 रोजी सिनेमा
बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. हे म्युझिक लाँच करण्यासाठी अमिताभ बच्चन यांनी
आपल्या आवाजातील एका ऑडियो क्लिपच्या माध्यमातून सगळ्यांना निमंत्रण पाठवले होते.
यापूर्वी म्हणजे सोमवारीच रजनीकांत आणि अमिताभ बच्चन शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुश सिन्हाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये एकत्र आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'शमिताभ'च्या म्युझिक लाँच इव्हेंटमधील खास क्षणचित्रे...