आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बी म्हणतात, \'मुलगी म्हणजे घरातील आत्मा\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगी श्वेतासोबत अमिताभ बच्चन)

कोलकाताः घरात आनंदाची निर्मिती करणारी मुलगीच असून मुलीला अत्यंत काळजी आणि प्रेमळ वागणूक दिली पाहिजे, असे मत बिग बी अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केले आहे. शुजित सरकार यांच्या 'पिकू' चित्रपटाच्या शूटिंगसाठी सध्या अमिताभ बच्चन कोलकात्यात आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन दीपिका पदुकोणच्या पित्याच्या भूमिकेत आहे.
अमिताभ यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, 'मुली या घरातील खास सदस्य असून जणू घरातील आत्माच असतात. त्यांची वर्तणूक, नियंत्रण, सुरक्षितता, विश्लेषक मनोवृत्ती, हुकमी स्वभाव, शिस्तप्रियता, शासन याद्वारे कुटुंबातील सर्व सदस्यांना एका धाग्यात बांधले जाते.'
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'पीकू' सिनेमाच्या शूटिंग सेटवरील अमिताभ बच्चन आणि त्यांच्या सहकलाकारांची छायाचित्रे...