आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan And Many Celebs Attend The Screening Of \'Haider\'

PICS: बिग बींनी पाहिला शाहिद-श्रद्धाचा \'हैदर\', स्क्रिनिंगमध्ये अवतरले होते तारांगण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, अमिताभ बच्चन, श्रद्धा कपूर, शाहिद कपूर आणि सिद्धार्थ रॉय कपूर)
मुंबईः शुक्रवारी 2 ऑक्टोबर रोजी बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूर स्टारर हैदर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात शाहिदसोबत श्रद्धा कपूर मेन लीडमध्ये सिनेमात झळकणार आहे. मंगळवारी सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते.
स्क्रिनिंगमध्ये महानायक अमिताभ बच्चन सहभागी झाले होते. त्यांनी शाहिद आणि श्रद्धाला सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या. सिनेमा बघितल्यानंतर अमिताभ यांनी ट्विट केले, "Haider: a special film.. exceptional performances.. and such an intelligent adaptation.. !!".
स्क्रिनिंगमध्ये बिग बींसह इम्तियाज अली, प्रभुदेवा, आदिति राव हैदरी, आशुतोष गोवारीकर, आयुष्मान खुराना, सिद्धार्थ रॉय कपूर, पत्रलेखा, तब्बू, विशाल मल्होत्रा सहभागी झाले होते. तर निर्माते रमेश तौरानी पत्नी स्नेहासोबत पोहोचले होते. हैदर हा सिनेमा विशाल भारद्वाज यांनी दिग्दर्शित केला आहे. स्क्रिनिंगला निर्माते सिद्धार्थ रॉय कपूर यांनीही हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...