आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: जेव्हा बिग बींच्या दीर्घायुष्यासाठी रेखाने मंदिरांमध्ये जाऊन घातले होते साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः रेखा)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी आज वयाची साठ वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी मद्रास (आता चेन्नई) येथे झाला. रेखा आणि महानायक यांची लव्ह स्टोरी सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र 'कुली' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान बिग बींना घायाळ झालेले बघून संपूर्ण देशासोबतच रेखासुद्धा खूप खचल्या होत्या. बिग बींच्या दीर्घायुष्यासाठी रेखा यांनी अनेक मंदिरांमध्ये जाऊन देवाला साकडे घातले होते. रेखा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने divyamarathi.com तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील हा किस्सा सांगत आहे...
मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अमिताभ मृत्यूशी झुंज देत होते. रुग्णालयात शेकडो लोक दररोज अमिताभ यांच्या तब्येतीची विचारपुस करण्यासाठी येत असायचे. याकाळात पत्नी जया बच्चन त्यांची देखभाल करत होत्या. शिवाय अभिषेक आणि श्वेता ही त्यांची मुले खूप लहान होती. या संघर्षाच्या काळात जया बच्चन मोठ्या हिंमतीने सर्वकाळी सांभाळत होत्या.
त्याचकाळात रेखा अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडाल्या होत्या. मात्र रेखा अमिताभ यांना भेटायला हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नव्हत्या. त्याचे कारण बिग बींच्या पत्नी जया होत्या.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, पुढे काय घडले...