आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जया यांचे वक्तव्य पडले महागात, बिग बींनी मागितली SRKची माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- जया बच्चन यांनी 'हॅपी न्यू इअर'वर केलेल्या वक्तव्याने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी शाहरुख खान आणि फराह खान यांच्या 'हॅपी न्यू इअर' सिनेमाला यावर्षीचा सर्वात 'बकवास' सिनेमा म्हणून टिका केली. मात्र, अमिताभ बच्चन यांनी सिनेमाची प्रशंसा केली.
जया यांनी सांगितले होते, की माझा मुलगा त्यात होता म्हणून मी हा सिनेमा पाहिला. सिनेमाविषयीची ही टिका जया यांनी सार्वजनिक केल्याने ती सर्वांपर्यंत पोहोचली. परंतु अमिताभ यांनी जया यांच्या वक्तव्याची शाहरुखजवळ माफी मागितली. अमिताभ यांनी एसएमएस पाठवून माफी मागितल्या कळते. त्यांनी आपल्या पत्नीच्या वतीने माफी मागितली आणि म्हणाले, की जयाचा हेतू शाहरुख किंवा त्याच्या सिनेमाचा अपमान करण्याचा नव्हता.
सिनेमा उद्योगाच्या एका सूत्राने ही माहिती दिली आहे. शाहरुख बच्चन कुटुंबीयांचा फॅमिली फ्रेंड आहे म्हणून अमिताभ यांनी त्याची माफी मागितली. तसे पाहता 'हॅपी न्यू इअर'मध्ये सर्वात जास्त स्तुती अभिषेक बच्चनची झाली आहे.
सूत्रांनी सांगितले, 'जया यांनी कमेन्ट केली त्या दिवशी रात्री अभिषेक आणि ऐश्वर्या स्वत: शाहरुखच्या घरी दिलगीरी व्यक्त करायला गेले होते.' मात्र ऐकिवात असे आहे, की गौरीने त्यांची भेट घेतली, शाहरुखने नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा यापूर्वीसुध्दा जया यांनी केली होती शाहरुखवर टिका...