आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Attends Screening Of \'Bombay To Goa\'

\'बॉम्बे टू गोवा\'च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले अमिताभ, बघा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत शनिवारी (12 एप्रिल) जुहूतील पीव्हीआरमध्ये दिवंगत अभिनेते महमूद यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी 'बॉम्बे टू गोवा' या गाजलेल्या सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. 'बॉम्बे टू गोवा' हा एक अॅडव्हेंचर कॉमेडी सिनेमा होता.
या सिनेमाच्या स्पेशल स्क्रिनिंगवेळी महानायक अमिताभ बच्चन पोहोचले होते. हे स्पेशल स्क्रिनिंग महमूद यांचे छोटे भाऊ अनवर अली यांनी आयोजित केले होते. स्क्रिनिंगला अमिताभ यांच्यासह टीनू आनंद, अब्बास मस्तान यांच्यासह बरेच सेलेब्स पोहोचले होते.
1972मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात महमूद यांनी बस कंडक्टरची भूमिका साकारली होती. त्यांनी आपल्या खास अंदाजात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते.
या कलाकारंनी सिनेमात साकारल्या होत्या महत्त्वूपूर्ण भूमिका -
* अमिताभ बच्चन- रवि कुमारची भूमिका साकरली होती.
* अरुणा ईरानी- मालाच्या भूमिकेत झळकल्या होत्या.
* शत्रुघ्न सिन्हा- वर्माचा रोल प्ले केला होता.
* अनवर अली- बस ड्रायव्हर राजेशच्या भूमिकेत दिसले होते.
* मुकरी- साउथ इंडियन प्रवाशाच्या भूमिकेत होते.
या कलाकारांसह मनमोहन, दुलारी, मनोरमा, सुंदर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात होत्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'बॉम्बे टू गोवा'च्या स्क्रिनिंगमध्ये सहभागी झालेल्या स्टार्सची खास छायाचित्रे...