आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Commentary At The India Pakistan Match

PHOTOS: भारत-पाक महासंग्रामाला लागला बिग बींच्या भारदस्त आवाजाचा तडका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कॉमेंट्री बॉक्समध्ये अभिनेते अमिताभ बच्चन)

मुंबई : आपल्या भारदस्त आवाजाने सिनेरसिकांच्या मनावर गारूड घालणारे बॉलिवडूचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची जादू रविवारी क्रिकेटच्या मैदानावर अनुभवायला मिळाली. 15 फेब्रुवारी रोजी अॅडिलेडच्या मैदानावर भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ल्डकपचा सामना खेळला गेला. या महासंग्रामाची कॉमेंट्री करताना अमिताभ बच्चन आपल्याला कॉमेंट्री बॉक्समध्ये दिसले.
बिग बींना एखाद्या क्रिकेट सामन्यासाठी कॉमेंट्री करण्याची ही पहिलीच वेळ होती. भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बिग बींनी माईकचा ताबा सांभाळला. यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत कपिल देव आणि शोएब अख्तर हे माजी खेळांडूसुद्धा होते.
हिंदी सिनेमांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांची रेडिओ जॉकी बनण्याची इच्छा होती. यासाठी त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये ऑडिशनही दिले होते. पण आवाजामुळेच ते फेल झाले होते. पण आता चार दशकांनंतर अमिताभ बच्चन यांनी हातात माईक घेतला आणि आपल्या खास शैलीत कॉमेंट्री करुन प्रेक्षकांची मने जिंकली.