आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Congratulate Malala And Satyarthi For Winning The Nobel Peace Prize

शांतता नोबेलसाठी बिग बींनी दिल्या सत्यार्थी आणि मलाला यांना शुभेच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज 72वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आजच्या या खास दिवशी अमिताभ यांनी मीडियाशीसुद्धा संवाद साधला. अमिताभ म्हणाले, आईवडिलांचा आशीर्वाद दररोज घेत असतो. आजसुद्धा त्यांचा आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडलो. ते सतत माझ्यासोबतच असतात.
करवा चौथच्या निमित्ताने यावर्षीसुद्धा उपवास केला आहे का? असा प्रश्न विचारल्यावर बिग बी म्हणाले, मी आधी उपवास करायचो, मात्र आता तब्येतीच्या कारणामुळे डॉक्टरांनी उपवास करण्यास मनाई केली आहे. मात्र आजचा दिवस घरच्यांसोबत घालवणार आहे आणि रात्री सर्वांसोबत भोजनाचा आनंद घेईल. वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेली खास भेटवस्तू कोणती? असे विचारल्यानंतर ते म्हणाले, नात आराध्याकडून कोणती भेटवस्तू मिळणार याची उत्सुकता मला आहे.
बिग बींनी यावेळी भारताचे कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानच्या मलाला युसूफझई यांना शांतता नोबेलसाठी शुभेच्छा दिल्या. चाहत्यांचे प्रेम, शुभेच्छांमुळे आपण आनंदी असून प्रेक्षकांमुळे काम करण्याची ताकद मिळते, असेही बिग म्हणाले.