आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: 'ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं', वाचा Big Bचे प्रसिद्ध डायलॉग्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('जंजीर' आणि 'दीवार'मधील अमिताभ बच्चन)
मुंबईः बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन आज आपला 72वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी' या सिनेमाद्वारे सुरु झालेला बिग बींचा प्रवास 'भूतनाथ रिटर्न्स' (2014) पर्यंत येऊन पोहोचला आहे. 70च्या दशकात 'जंजीर', 'अभिमान', 'नमक हराम', 'रोटी कपडा और मकान', 'मजबूर', 'चुपके चुपके', 'मिली', 'दीवार', 'शोले', 'कभी कभी', 'शोले', 'हेरा फेरी', 'अमर अकबर एंथनी', 'खून पसीना', 'परवरिश', 'त्रिशूल' यांसारखे हिट सिनेमे बिग बींनी बॉलिवूडला दिले आहेत.
गेल्या 45 वर्षांत बिग बींनी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर वर्चस्व गाजवले आहे. वाढत्या वयासोबत बिग बींच्या चाहत्यांमध्येही वाढच होत चालली आहे. अमिताभ यांच्या सिनेमातील त्यांची संवादफेक शैलीचे लोक दिवाने आहेत. जंजीर या सिनेमातील 'जब तक बैठने को ना कहा जाए शराफत से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं' हा संवाद प्रेक्षकांच्या एवढा पसंतीस पडला, की आजही तो त्यांच्या चाहत्यांच्या तोंडी रेंगाळत असतो. सुपरहिट डायलॉग्समुळेच बिग बींना अँग्री यंग मॅनचा खिताब मिळाला आहे. आज अमिताभ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या सिनेमातील असेच काही निवडक गाजलेले संवाद सांगत आहोत....

सिनेमाः जंजीर
रिलीजः वर्ष 1973
दिग्दर्शकः प्रकाश मेहरा
संवादः 'जब तक बैठने को ना कहा जाए शराफत से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बाप का घर नहीं'

सिनेमाः दीवार
रिलीजः वर्ष 1979
दिग्दर्शकः यश चोप्रा
संवादः 'आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, बँक बॅलेंस है तुम्हारे पास क्‍या है?'

पुढील स्लाईड्समध्ये वाचा बिग बींचे प्रसिद्ध डायलॉग्स...