आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BOllywood Superstar Amitabh Bachchan And His On Screen Heroines

रेखा, जया, हेमा, भेटा अमिताभ यांच्या ऑन स्क्रिन हीरोईन्सना...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन: 'बागवान'मध्ये हेमा मालिनी, 'सिलसिला'मध्ये रेखा आणि 'कुली'मध्ये रति अग्निहोत्रीसोबत)

मुंबईः शतकाचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आज वयाची 72 वर्षे पूर्ण केली आहेत. 1969 मध्ये 'सात हिंदुस्तानी'पासून सुरु झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास भूतनाथ रिटर्न्स (2014)पर्यंतयेऊन पोहोचला आहे. सत्तरच्या दशकात अनेक स्टार्सचा बोलबाला होता. मात्र बिग बींनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांना मागे टाकले. त्यांनी सिल्व्हर स्क्रिनवर 'जंजीर', 'अभिमान', 'नमक हराम', 'रोटी कपडा और मकान', 'मजबूर', 'चुपके चुपके', 'मिली', 'दीवार', 'शोले', 'कभी कभी', 'शोले', 'हेरा फेरी', 'अमर अकबर एंथनी', 'खून पसीना', 'परवरिश', 'त्रिशूल' यांसह अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले.
गेल्या 45 वर्षांपासून छोट्या आणि मोठ्या पडद्यावर बिग बींचे वर्चस्व आहे. आपल्या करिअरमध्ये बिग बींनीअनेक अभिनेत्रींबरोबर ऑन स्क्रिन रोमान्स केला. नूतन, माला सिन्हा या सीनिअर अभिनेत्रींबरोबरच मनीषा कोईराला, शिल्पा शेट्टी या कमी वयाच्या अभिनेत्रींही अमिताभ यांच्या नायिका म्हणून सिनेमांमध्ये त्यांच्याबरोबर झळकल्या होत्या.

कुमुद छुगानी (बंधे हाथ), लक्ष्मी छाया (रास्ते का पत्थर), सुमिता सान्याल (आनंद) या कधीही प्रसिद्धीझोतात न आलेल्या अभिनेत्रींबरोबरही बिग बींनी काम केले आहे. काही अभिनेत्रींबरोबरची अमिताभ यांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
ऑनस्क्रिन कोणकोणत्या अभिनेत्रींबरोबर अमिताभ यांची जोडी गाजली यावर एक नजर टाकुया...