आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan In BMC\'s Tb Harega Desh Jitega Campaign

\'मला टीबी होता, मात्र आता पूर्णपणे बरा झाला आहे\', बिग बींचा पहिल्यांदाच खुलासा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेता अमिताभ बच्चन यांनी पहिल्यांदा सार्वजनिक ठिकाणी सांगितले, की 14 वर्षांपूर्वी त्यांना टीबी झाला होता. त्यावेळी त्यांनी एका टीव्ही गेम शोसाठी शूटिंग करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना हा आजार कळाला. अमिताभ यांनी रविवारी (21 डिसेंबर) बीएमसीच्या 'टीबी हारेगा, देश जीतेगा' कॅम्पेनमध्ये याचा खुलासा केला.
बच्चन यांनी सांगितले, की रोज सकाळी उठल्यानंतर त्यांना अशक्तपणा जाणवत होता. तापसणी केल्यानंतर माहित झाले, की त्यांना टीबी आहे. टीबीचा सामना करण्यासाठी त्यांना एक वर्ष लागले. त्यांनी या कॅम्पनमध्ये लोकांना लवकरात-लवकर टीबीवर उपचार करण्यास सुरुवात करा, असे अपील केले. त्यांनी पुढे सांगितले, 'आज मी या आजारापासून पूर्ण बरा झालो आहे.'
आमिताभ म्हणाले, की त्यांनी कधीच सार्वजनिक ठिकाणी या आजाराविषयी सांगितले नव्हते. परंतु आता लोकांना जागरुक करण्याची वेळ आली आहे. ते पुढे म्हणाले, 'मी आजाराने त्रस्त असूनदेखील माझे काम नियमित करत होतो. आज अनेक चांगले औषधे बाजारात उपलब्ध आहेत. तुम्हाला केवळ औषध वेळेवर घ्यायचे आहेत. टीबीवर उपचार करण्यासाठी चांगले डॉक्टर्स आणि तज्ञसुध्दा आहेत.'