Home | Off Screen | Amitabh Bachchan In Different Look In Film Shamitabh

'शमिताभ'मधील बिग बींचा वेगळा लूक आला समोर, मेकओव्हरने या भूमिकांनाही केले हिट

दिव्य मराठी नेटवर्क | Update - Jun 05, 2014, 09:07 AM IST

अभिनेता अमिताभ बच्चन यांचे 70पेक्षा जास्त वय झाले असले तरीदेखील काम करण्याची उमेद मात्र तशीच टिकून आहे. कदाचित याच कारणाने त्यांना महानायक असे संबोधले जात असावे. अलीकडेच त्यांचा नवीन लूक समोर आला आहे.

 • Amitabh Bachchan In Different Look In Film Shamitabh
  अभिनेता अमिताभ बच्चन यांचे 70पेक्षा जास्त वय झाले असले तरीदेखील काम करण्याची उमेद मात्र तशीच टिकून आहे. कदाचित याच कारणाने त्यांना महानायक असे संबोधले जात असावे. अलीकडेच त्यांचा नवीन लूक समोर आला आहे. दिग्दर्शक आर. बल्की यांच्यासह बिग बी 'शमिताभ' सिनेमात काम करत आहेत.
  प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अमिताभ पुन्हा एकदा नवीन लूकमध्ये दिसणार आहेत. हा लूक त्यांच्या चाहत्यांना नक्कीच भूरळ घालणारा ठरणार आहे. बिग बी अशा लूकमध्ये 'शमिताभ' सिनेमात एका जेष्ठ व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहेत. या गेटअपमध्ये त्यांनी पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान केलेला होता. त्यांची दाढी आणि डोक्यावरील केस वाढलेले होते.
  या सिनेमात 'रांझणा'मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केलेला धनुषसुध्दा दिसणार आहे. तसेच, दक्षिणचे सुपरस्टार कमल हसन यांची धाकटी मुलगी अक्षरा या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करथ आहे. असे म्हटले जाऊ शकते, की हा सिनेमा मोठा ठरू शकतो.
  यापूर्वी बिग बी आणि आर. बल्की यांनी 'पा' सिनेमामध्ये एकत्र काम केले होते. त्यामध्ये अमिताभ खूपच हटके आणि वेगळ्या लूकमध्ये दिसले होते. सिनेमातील खास भूमिकेसाठी आणि आपली लोकप्रियता वाढवण्यासाठी स्टार्स आपल्या लूककडे विशेष लक्ष देतात.

  पुढील स्लाइड्सवर वाचा... भूमिकेसाठी या स्टार्सनेसुध्दा बदलला आपला लूक...

 • Amitabh Bachchan In Different Look In Film Shamitabh
  सिनेमा- गजनी
  अभिनेता- आमिर खान
  आमिर खान 'गजनी' सिनेमामध्ये खूपच वेगळ्या लूकमध्ये दिसला होता. त्याची हेअरस्टाइल तरुणांसाठी एक ट्रेंड ठरली होती. त्याच्या हेअरस्टाइलने तरुणांना क्रेझी बनले. हेअरस्टाइल व्यतिरिक्त आमिरने बॉडी बनवण्यासाठीसुध्दा जिममध्ये खूप मेहनत घेतली होती. त्याचे पात्र काहीप्रमाणात त्याच्या हटके लूकने हिट झाले आहे.
   
 • Amitabh Bachchan In Different Look In Film Shamitabh
  सिनेमा- क्रिश 2
  अभिनेता- हृतिक रोशन
  सायन्स फिक्शनवर आधारित हृतिक रोशनचा 'क्रिश 2'मध्ये काही अशाप्रकारे दिसला होता. त्याने या सिनेमात दुहेरी भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या पहिल्या भागातसुध्दा त्याचा हटके लूक दिसला होता.
   
 • Amitabh Bachchan In Different Look In Film Shamitabh
  सिनेमा- पा
  अभिनेता- अमिताभ बच्चन
  अमिताभ बच्चन त्यांच्या यापूर्वीच्या 'पा' सिनेमातसुध्दा वेगळ्या लूकमध्ये दिसले होते. त्यामध्ये त्यांची ओळख पटणेदेखील कठिण होते. 'पा' सिनेमात त्यांनी 13 वर्षांच्या मुलाची भूमिका साकारली होती. तो मुलगा प्रोजेरिया नावाच्या आजाराने त्रस्त असतो.
 • Amitabh Bachchan In Different Look In Film Shamitabh
  सिनेमा- अग्निपथ
  अभिनेता- संजय दत्त   
   बिग बी यांच्या सिनेमाचा रिमेक 'अग्निपथ'मध्ये संजय दत्तसुध्दा एका वेगळ्या लूकमध्ये दिसला होता. या सिनेमात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. 'कांचा' नावाच्या भूमिकेमध्ये संजयलाच्या अभिनयसह लूकला खास पसंत केल्या गेले.
   
 • Amitabh Bachchan In Different Look In Film Shamitabh
  सिनेमा- क्रिश 3
  अभिनेत्री- कंगना रानोट
  या सिनेमात अभिनयापेक्षा मेकअप आणि कॉस्ट्यूमसाठी कंगणाला ही भूमिका एक आव्हानात्मक होती. सांगितले जात होते, की या सिनेमामध्ये तिचा कॉस्ट्युम जवळपास 30 किलोंचा होता. कंगणाच्या सांगण्यानुसार, या सिनेमातील ही भूमिका तिच्यासाठी एक आव्हानात्मक होती.
 • Amitabh Bachchan In Different Look In Film Shamitabh
  सिनेमा- मेरीकॉम
  महिला बॉक्सर मेरीकॉमच्या जीवनपटावर बनवल्या जात असलेल्या सिनेमात प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका आहे. प्रियांकासाठी ही भूमिका आव्हानात्मक आहे. या पात्रासाठी तिला तासन् तास मेकअप रुममध्ये बसावे लागत आहे. सध्या सिनेमाचे शुटिंग चालू आहे आणि लवकरच या सिनेमातील प्रियांका नवीन लूक समोर येणार आहे.
 • Amitabh Bachchan In Different Look In Film Shamitabh
  सिनेमा- हैदर
  अभिनेता- शाहिद कपूर
  अभिनेता शहिद कपूरच्या 'हैदर' या आगामी सिनेमातील त्याच्या लूकची बरीच चर्चा झाली होती. काही दिवसांपूर्वी शाहिदचा फस्ट लूक समोरह आला. सांगितले जाते, की सिनेमात तो देसी हेमलेटमच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.       

Trending