आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरवर्षी करवा चौथचा उपवास करतात बिग बी, यावेळी केला नाही उपवास, जाणून घ्या का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवारी (11 ऑक्टोबर) अमिताभ बच्चन यांनी 72वा वाढदिवस साजरा केला. त्यांनी जनक बंगल्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला.
(माध्यमांशी बोलताना बिग बी)
मुंबई: असे पहिल्यांदा झाले, की अमिताभ यांनी माध्यमांना वाट पाहायला लावली. बॉलिवूड जगात त्यांच्या वेळेच्या बंधनाचे किस्से प्रसिध्द आहेत. मात्र, चाहत्यांनी आणि माध्यमांनी शनिवारी (11 ऑक्टोबर) दोन तास त्यांनी वाट पाहिली. त्यांची बर्थडे पार्टी शुक्रवारी रात्री ठेवण्यात आली होती. कारण शनिवारी घरातील सर्व महिलांनी करवा चौथचा उपवास ठेवलेला होता. अमिताभसुध्दा प्रत्येक वर्षी हा उपवास करतात. परंतु यावेळी त्यांना हा उपवास करणे शक्य नव्हते. याविषयी त्यांनी सांगितले, 'सुरुवातीला मीसुध्दा हा उपवास करत होतो. परंतु आता मला औषध घ्यावे लागतात. त्यामुळे उपवास करणे शक्य होत नाही. आज पूर्ण दिवस कुटुंबीयांसोबत घालवणार आणि अपेक्षा आहे, की चंद्र वेळेवर दिसेल. कारण करवा चौथच्या दिवशी हा महाशय उशीरा प्रगट होतात.'
बर्थडे आणि रोज मोठ्या प्रमाणात त्यांच्या घरी पुष्पगुच्छ येत असतात. हे पुष्पगुच्छ ते जवळच्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात. यावेळी जनक आणि इतर बंगल्यांच्या बाहेर फुलांची सजावट दिसली नाही. अमिताभ म्हणाले, यावर्षी मीच फुलांप्रमाणे सजून आलो आहे. 'सुरुवातीला आम्ही बंगल्याच्या बाहेरील फाटकावर फुलांची सजावट करत होतो. परंतु जया यांचे म्हणणे आहे, की विनाकारण फुले वाया जातात, त्यामुळे यावर्षी केवळ घरातच फुले दिसून आले.' ते प्रत्येक वर्षी बर्थडे निमित्त 'प्रतीक्षा' बंगल्यामध्ये जातात. त्यांनी पुढे सांगितले, 'आई-बाबूजी प्रतिक्षामध्येच राहतात, त्यामुळे आम्ही प्रत्येक दिवशी तिथे जातो. आज खास दिवस होता, म्हणून दिवसाची सुरुवातसुध्दा आई-बाबूजी यांच्या आशीर्वादीने झाली.'
बर्थडे निमित्त मिळालेल्या भेटवस्तूंविषयी त्यांनी सांगितले, 'कुटुंबीयांनी प्रेम आणि स्नेह काल रात्रीच्या पार्टीत दिला. मी सकाळी घरातून निघालो तेव्हा आराध्या झोपलेली होती. तिला भेटल्यानंतर मला खास भेटवस्तूविषयी माहित होईल. सतत मॅसेजेस, फोन कॉल्स चालू आहेत. सर्वांचे वेळेवर आभार मानण्याचा प्रयत्न करत आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या बिग बींनी वाढदिवसानिमित्त माध्यमांशी काय-काय शेअर केले...