आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शमिताभ'वर अमिताभ यांचा खास Interview, आयुष्याशी निगडीत गोष्टी केल्या शेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अमिताभ बच्चन)
आपल्या 45 वर्षांच्या फिल्मी अनुभवांपेक्षाही कमी वयाच्या धनुष आणि अक्षरासोबत अमिताभ बच्चन यांनी 'शमिताभ'मध्ये सहजरित्या काम केले. ते धनुष आणि अक्षराचे गुणगाण गाताना थकत नाहीत. त्यांची दिनचर्या पहाटे सुरु होते, तर रात्री उशीरा ब्लॉग संपते. 6 फेब्रुवारीला रिलिज होणा-या 'शमिताभ' सिनेमाच्या प्रचारासाठी अमिताभ तासन् तास मुलाखत देत आहेत.
त्यासाठी ते देश-परदेशात फिरणार आहेत. 'युध्द' मालिकेत सारिका आणि या सिनेमात त्यांच्या मुलीचे पात्र साकारणा-या अक्षराविषयी ते सांगतात, 'मी तीन सिनेमे, युध्द आणि केबीसीचे शूटिंग करत होतो. दोन्ही पिढ्यांसोबत काम करणे खूप चांगला अनुभव आला. आणखी काम करण्यास संधी मिळाली तर आनंदच आहे.' चेह-यावरील सतेज आणि उर्जेचे रहस्य विचारल्यानंतर अमिताभ सांगतात, 'साधे आयुष्य आणि सर्वांचे प्रेम हेच आहे उर्जेचे स्त्रोत.' जाणून घ्या 'शमिताभ' निमित्त अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेली बातचीत...
धनुष आणि अक्षरा तुमच्या उपस्थितीने घाबरले होते.
दोघे सक्षम कलाकार आहेत. धनुष दक्षिणमध्ये प्रसिध्द कलाकार आहे. अक्षराचा हा पहिलाच सिनेमा आहे. परंतु तुम्ही सिनेमे पाहिल्यास तुम्हाला जाणवणार नाही तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. आजच्या पिढीचे खूप सक्षम आहेत. सर्व शिकून येतात आणि तुम्हाला माहित नसेल यांनी किती कष्ट घेतले आहेत. अक्षरा-धनुष यांना अनेक महिन्यांपूर्वी भाषेवर काम केले. नंतर बाल्कीसोबत मिळून पात्र समजून घेतले आणि संशोधन केले.
बाल्की तुमचे मित्र आणि दिग्दर्शक आहे, यापेक्षा आणखी कोणते नाते आहे?
कुटुंबातील सदस्य मानतो. जेव्हा तुमची एखाद्या व्यक्तीसोबत ओळख होते. त्यावेळी त्या व्यक्तीसोबत काम करण्यात अचडण येत नाही. ते आजही जाहिरात एजेन्सी चालवतात. त्यांच्यासोबत आम्ही सुरुवातीला जाहिराती केल्या. एक दिवशी त्यांनी आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली, की त्यांना दिग्दर्शक व्हायचे आहे. सिनेमा बनवायचा आहे आणि तोही तुमच्यासोबत. मी म्हणालो, ठिक आहे बनवू. त्यानंतर आमचे काम सुरु. अपेक्षा आहे, की त्यांच्याकडे खूप काही असेल आमच्यासाठी.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा अमिताभ बच्चन काय म्हणाले...