आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan Interview At Bhaskar On Upcoming Movie Shamitabh

INTERVIEW : \'शमिताभ\'चा ट्रेलर पाहून खूप आनंदी आहेत रजनीकांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिग्दर्शक आर बाल्की यांच्या आगामी 'शमिताभ' सिनेमामध्ये बिग बी आपल्या लुकबाबत चर्चेत आहेत. हा सिनेमा येत्या 6 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. अमिताभ बच्चन यापूर्वी आर. बाल्की यांच्या 'चीनी कम' आणि 'पा'सारख्या सिनेमांतसुध्दा दिसले आहेत. या सिनेमांप्रमाणेच 'शमिताभ'मध्येसुध्दा बिग बी यांचे एक वेगळे पात्र दिसणार आहे.
सिनेमात बिग बी कधी रॉयल लूकमध्ये तर कधी विस्कटलेले केसांच्या फंकी लूकमध्ये दिसणार आहेत. शिवाय सिनेमात त्यांच्या डोळ्यात काजळ आणि लूज शर्टचे रफ अँड टफ लूकसुध्दा चाहत्यांना सरप्राइज करणारा आहे. अमिताभ या सिनेमात ब्लॅक राऊंड ग्लासेस आणि ब्लॅक सूट परिधान करून क्लासिक लूकमध्येसुध्दा दिसणार आहेत.
divyamarathi.comने मुंबईच्या सन-अँडसँड हॉटेलमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी 'शमिताभट विषयी चर्चा केली. या बातचीतचे काही अंश...
प्रश्न- 'शमिताभ'मध्ये तुम्ही रजनिकांत यांच्या जावई धनुष आणि कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसनसोबत काम करत आहात. रजनिकांत आणि कमल हसन दोघेही दक्षिणचे सुपरस्टार आणि तुमचे चांगले मित्रदेखील आहेत. 'शमिताभ'विषयी त्यांच्याशी चर्चा केली होती?
उत्तर- मी चेन्नईला गेलो होतो, तेव्हा रजनीकांत यांना भेटलो होतो. मी नेहमी त्यांच्याशी फोनवर संपर्क साधतो. मी तिथे रजनी यांच्यासोबत सिनेमाविषयी चर्चा केली. शमिताभचा ट्रेलर पाहून रजनी खूप उत्साही झाले होते. त्यांनी कहाणी आणि सिनेमाची प्रशंसा केली. सिनेमात धनुष आहे, तो रजनी यांचा जावई आहे. हे माझ्यासाठी चांगले होते, कारण रजनी माझे चांगले मित्र आहेत. तसे पाहता, तुम्ही एखाद्या सिनेमावर दोन किंवा तीन महिने काम करता तेव्हा सिनेमाचा प्रत्येक सदस्य तुम्हाला कुटुंबासारखा असतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अमिताभ बच्चन यांची संपूर्ण मुलाखत...