आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी स्वीकारले पाकिस्तानचे आमंत्रण, म्हणाले, \'नक्की येईल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन हे पाकिस्तानच्या एका वृत्त वाहिनीसोबत बातचीत करताना म्हणाले, 'तुम्ही मला आमंत्रित केले आहे तर मी नक्कीच येईल.' यापूर्वीसुध्दा त्यांनी म्हटले होते, 'जर पाकिस्तानने मला आमंत्रित केले तर मी नक्कीच जाईल.' एक्स्प्रेस न्यूजच्या मुलाखतीत अमिताभ यांनी सांगितले, 'मला पाकिस्तानची भ्रमंती करायला आवडेल. तुम्ही मला बोलवा मी लगेच येईल.' त्यावेळी त्यांनी आईसोबत केलेल्या कराची आणि लाहोरच्या भ्रमंतीच्या आठवणींना उजाळा दिला. अमिताभ यांची आई तेजी बच्चन यांचा जन्म पाकिस्तानच्या लायपुरमध्ये झाला होता. हे ठिकाण आता फैसलाबाद म्हणून ओळखले जाते.
अमिताभ बच्चन यांची पाकिस्तानच्या एकाद्या वृत्तवाहिनीने घेतलेली ही पहिलीच मुलाखत होती. ते म्हणाले, 'माझे पाकिस्तानमध्येसुध्दा चाहते आहेत हे ऐकून खूप आनंद झाला. मला दोन्ही देशांमधील चांगले नाते-संबंध बघायला आवडेल. आपण सर्व एकाच धरतीवर राहतो. एकच आहोत. पाकिस्तानमध्ये माझे खूप मित्र आहेत. जेव्हा कधी आम्ही परदेशात भेटतो तेव्हा वाटते, की आपल्याच लोकांना भेटलो.' त्यांना पाकिस्तानच्या लॉलिवूडचे सिनेमेसुध्दा खूप आवडतात असेही त्यांनी सांगितले. त्यातील त्यांनी मुहम्मद अली यांची भूमिका असलेला सिनेमा बघितला आहे.
टि्वटरवर केले युवराजचे समर्थन, वाचा पुढील स्लाईड्सवर, सोबतच, वाचा बिग बींनी कशी दूर केली विनोदवीर कपिल शर्माची तक्रार ...