आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'युद्ध'च्या शूटिंगवेळी ट्रेन दिसताच भूतकाळात रमले बिग बी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांना बालपणापासूनच धावणारी ट्रेन बघणे पसंत आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ते आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात रेल्वे स्टेशनवर जाऊन ट्रेन बघायचे. अलीकडेच बिग बींनी त्यांच्या बालपणी रेल्वे स्टेशनवर घडलेली घटना आपल्या ब्लॉगवर सांगितली आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगवर लहानपणी रेल्वे स्टेशनवर हरवल्याची गोष्ट चाहत्यांसोबत शेअर केली.

बिग बींनी लिहिले, "मी 2 वर्षांचा असताना आपल्या आईवडिलांबरोबर अलाहाबादपासून कराचीला जाणाऱ्या ट्रेनने आजी-आजोबांना भेटायला जायचो. अलाहाबाद ते कराचीचा प्रवास दोन दिवसांचा होता. कराचीहून परतत असतांना ज्या स्टेशनवर ट्रेन बदलावी लागत असे त्या स्थानकावर ही घटना घडली होती. त्या स्टेशनवर प्रवाशांची खूप गर्दी आणि गोंधळाचे वातावरण होते. या दरम्यान मी वडिलांबरोबर नसल्याचे अचानकच माझ्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर एकच कल्लोळ माजला. माझ्या आईवडिलांनी संपूर्ण रेल्वेस्थानकावर माझा शोध सुरू केला. मोठमोठ्याने मला हाका मारत आणि कोणी दोन वर्षाच्या मुलाला पाहिले आहे का असे विचारत ते मला शोधत होते. तेव्हा शोधाशोध करून खचलेल्या माझ्या आईवडिलांजवळ एक मनुष्य आला आणि त्याने एका लहान मुलाला रेल्वेच्या पुलावर पाहिल्याचे सांगितले. माझे पालक धावतच मी ज्या ठिकाणी पुलावर बसलो होते तेथे आले. मी मात्र त्या पुलावर बसून मस्तपैकी येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेन्स पाहत बसलो होतो. त्यावेळी ट्रेन बघण्यात येणारी मजा मी आजही कधीकधी अनुभवतो, आणि लहानपणीच्या त्या आठवणीत पुन्हा जातो."

आईने सोडले उच्च राहणीमान...
अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगवर पुढे लिहिले, की त्यांची आई तेजी बच्चन यांनी त्यांचे वडील हरिशवंश राय बच्चन यांच्यासाठी आपले रॉल्स रॉयसचे उच्च राहणीमान सोडले होते. एका शिख महिलेने अलाहाबादमध्ये मध्यमवर्गीय कुटुंबात येऊन गृहिणी होणे पसंत केले. बिग बींनी लिहिले की, त्यांच्या आईचा जन्म लयालपूर (आता पाकिस्तानातील फैसलाबाद) येथे झाला होता.
बिग बींना ही गोष्ट 'युद्ध' या मालिकेच्या शूटिंगवेळी आठवली. ते मुंबईत या मालिकेतील एक अॅक्शन सीन चित्रीत करत होते. त्यावेळी तेथून एक ट्रेन गेली. ही ट्रेन बघून ते भूतकाळात रमले. हीच आठवणी त्यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. शिवाय यूद्धच्या अॅक्शन सीन्सची काही छायाचित्रेसुद्धा त्यांनी शेअर केली आहेत. पुढे पाहा ही
छायाचित्रे...
फोटो साभार: http://srbachchan.tumblr.com/