नवी दिल्लीः महानायक
अमिताभ बच्चन यांनी शुक्रवारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची काही छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर झाली आहेत. या भेटीमागचे कारण स्पष्ट झालेले नाही.
अलीकडेच
बिग बींनी
आपल्या आगामी 'पीकू' या सिनेमाचे शूटिंग पूर्ण केले. ते सध्या नवी दिल्लीत मुलगी श्वेता आणि नातवंडांसोबत (अगस्त्य आणि नव्या) वेळ घालवत आहोत. याचदरम्यान त्यांनी वेळ काढून पंतप्रधानांची सदिच्छा भेट घेतली.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतरची पहिलीच भेट...
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी घेतलेली त्यांची ही पहिलीच भेट आहे. बिग बी आणि मोदी यांची मैत्री जुनी आहे. जेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा बिग बींनी गुजरात टुरिज्मचा प्रचार केला होता. म्हटले जाते, की यासाठी बिग बींनी मानधन घेतले नव्हते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा पीएम मोदींनी शेअर केलेली बिग बींसोबतच्या भेटीची छायाचित्रे...