आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIXमध्ये पाहा 'शमिताभ'मधील अमिताभ, धनुष आणि अक्षराचा नवीन लूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - आगामी 'शमिताभ' सिनेमातील अमिताभ, धनुष आणि अक्षराचा नवीन लूक)
मुंबई - आर. बाल्की यांच्या आगामी 'शमिताभ' या सिनेमातील अमिताभ बच्चन, धनुष आणि अक्षरा हसनचा नवीन लूक समोर आला आहे. 'शमिताभ'मध्ये अमिताभ हटके लूकमध्ये दिसत आहेत. या सिनेमात अमिताभ काही सीन्समध्ये खूप म्हातारे दिसणार आहेत.
फेसबुकवर अमिताभ यांनी काही फोटो अपलोड करुन ट्विट केले, ''माझ्याकडे शब्द नाहीत. मात्र माझी काही छायाचित्रे आहेत आणि छायाचित्रे अमर असतात. साउथ सुपरस्टार आणि टॅलेंटेड अभिनेता धनुषसोबतचा हा माझा नवीन सिनेमा आहे.''
बिग बी यापूर्वी आर. बल्की दिग्दर्शित 'चीनी कम' आणि 'पा' यासिनेमांमध्ये झळकले आहेत. आता आगामी 'शमिताभ' या सिनेमातसुद्धा ते वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. बिग बींनी धनुष आणि अक्षरासोबतचे एक छायाचित्र अपलोड केले आहे. या सिनेमाद्वारे अभिनेते कमल हसनची धाकटी कन्या अक्षरा हसन बी टाऊनमध्ये पदार्पण करत आहे. ती या सिनेमातील एका सीनमध्ये ब्लॅक राउंड ग्लासेसह ब्लॅक सूट परिधान करुन क्लासिक लूकमध्ये दिसत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'शमिताभ' या आगामी सिनेमातील कलाकारांच्या नवीन लूकची खास झलक...