आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बिग बीं'नी दोस्ती निभावली नाही?,बॉलीवूडमध्ये मैत्री जास्त दिवस टिकत नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशच्या विवाह सोहळ्यात सहकुटुंब उपस्थित राहून बिग बी अमिताभ बच्चन यांनी शत्रुघ्न सिन्हांसोबतची मैत्री कायम असल्याचे सिद्ध केले. अमिताभ यांनी २००७ मध्ये अभिषेकच्या विवाहाप्रीत्यर्थ सर्वांना मिठाई पाठवली होती. त्यात शत्रुघ्न यांचाही समावेश होता. त्या वेळी शत्रुघ्न यांनी विवाहाला बोलावले नाही तर मग मिठाई कशाला पाठवली, असा शॉटगन प्रश्न करून मिठाई परत केली होती. त्यानंतर दोघे थेट कुशच्या विवाहातच एकत्र दिसले.
अमिताभसोबत काम करणा-या अनेक कलाकारांनी म्हटले आहे की, ते कोणत्याही सहकलावंताचे मित्र बनू शकत नाहीत. अमिताभ यांनी रुपेरी पडद्यावर अनेक कलावंतांसमवेत चांगली जोडी जमवली. परंतु कुणासोबतच गाढ मैत्री केली नाही. विनोद खन्ना, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा असो वा धर्मेंद्र. अमजद खान यांनी तर उघडपणे म्हटले होते की, अमिताभ कधीच चांगले मित्र बनले नाहीत. ज्या मेहमूदने अमिताभ यांना संधी दिली त्यांनीही म्हटले होते की, अमिताभने माझ्यासोबत जे केले ते इतर कुणासोबत करू नये. याउलट अमिताभ यांनी एका मुलाखतीत कठीण प्रसंगात माझे सर्व मित्र बदलले होते, असा आरोप केला होता. एके रात्री असा विचार करत राहिलो, मी कोण आहे? उत्तर मिळाले, एक अभिनेता. त्या दिवशी सकाळी ७ ला फोन करून त्यांनी यश चोप्रांकडे काम मागितले. अमिताभ यांचे निकटवर्तीय राहिलेल्या अमरसिंह यांनीही अमिताभवर मैत्री न निभावल्याचा आरोप केला होता.
मात्र, अमिताभ यांनी एका मुलाखतीत त्यांची स्तुती केली. मृत्युदाता चित्रपट अपयशी ठरल्यावर अमिताभ निराश होते. त्यांची एबीसीएल कंपनी दिवाळखोर झाली होती. इन्कम टॅक्सवाले हात धुऊन त्यांच्या मागे लागले होते. अशा स्थितीत अमर सिंह यांनी बच्चन यांना कर्जातून बाहेर काढले. त्याउपरही आज त्यांच्या मैत्रीत दरी निर्माण झाली आहे.

पुढे वाचा बॉलीवूड मैत्रीची काही उदाहरणे....