आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan To Work With Vidhu Vinod Chopra Again

अमिताभ आता खेळणार ‘बुद्धीबळा’चा डाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : ‘भूतनाथ 2’मध्ये भूत बनून निवडणूक लढवल्यानंतर अमिताभ बच्चन आता खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहेत. पण आश्चर्य वाटण्याचे काहीही कारण नाही. अमिताभजी कुठल्याही मैदानी खेळ खेळणा-या खेळाडूची भूमिका करणार नाहीत. ते बुद्धीबळ या खेळात प्रवीण असणा-या ग्रॅँडमास्टरची भूमिका करणार आहेत. विधू विनोद चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. चोप्रा यांच्या ‘एकलव्य : द रॉयल गार्ड’ या चित्रपटात आधी अमिताभ यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. आता चित्रपटाचे दिग्दर्शक विजय नंबियार अमिताभ यांना बुद्धीबळपटू म्हणून पडद्यावर साकारणार आहेत. विशेष म्हणजे अमिताभजी या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर यांना बुद्धीबळाचे डावपेच शिकवणार आहेत.
'भूतनाथ'मध्ये निवडणुकीचा विषय मांडल्यानंतर अमिताभ यांची ही बुद्धीबळातील ग्रॅँडमास्टरची भूमिका व फरहानबरोबरचा त्यांचा अभिनय म्हणजे प्रेक्षकांसाठी एकप्रकारे ‘कोम्बो’ पॅकेजच ठरणार आहे. फरहान अख्तर यांच्या अभिनायावर अमिताभ असेही आधीपासूनच प्रभावित आहेत. त्यामुळे फरहानबरोबर काम करण्याची अत्यंत उत्सुकता आहे असे अमिताभ यांनी म्हटले आहे. अमिताभ यांच्या करिअरमध्ये सलीम-जावेद यांच्या कथांचे फार मोठे योगदान आहे आता जावेद यांचा मुलगा फरहानबरोबर काम करण्याची जशी अमिताभ यांना उत्सुकता आहे तशीच त्यांना आदरस्थानी मानणा-या फरहानसाठीही ही फार चांगली संधी आहे. आता फरहान 'शादी के साइइ इफेक्ट्स'मुळे आलेल्या अपयशानंतर अमिताभ यांच्याकडून व्यवहार कुशलता शिकतो का हे फक्त बघायचे.