आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कुली\'तील अपघातापासून ते दिवाळखोर होण्यापर्यंत, वाचा अमिताभ यांचे संघर्षाचे 5 किस्से

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या गोष्टीला सांगण्यासाठी शब्दांपेक्षा प्रभावी माध्यम नाही. परंतु, जगातील काही व्यक्तींना शब्दांमध्ये व्यक्त करणे काही शक्य नाही. बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असलेले सुपरस्टार अमिताभ बच्चन असेच एक व्यक्तिमत्त्व आहे.
अमिताभ बच्चन यांचा आज 72 वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील त्यांची कारकिर्द अगदी अविस्मरणीय आहे. या प्रवासात त्यांनी मोठे नाव कमविले आहे. भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांच्या मनावर अवीट अभिनयाची छाप सोडली आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्या तर आकड्यांमध्ये मोजणेही अवघड आहे.
अलाहाबादच्या एका साध्या वसाहतीत जन्म झालेले अमिताभ बच्चन ऊर्फ अमित श्रीवास्तव कधी काळी बॉलिवूडचे सुपरस्टार होतील, असे कुणाला वाटले नव्हते. अमिताभ यांच्या आयुष्याशी जुळलेली प्रत्येक गोष्ट रंजक आहे. परंतु, अपवादानेच त्यांनी केलेल्या कठोर संघर्षाची चर्चा होते. सध्या मुंबईत बॉलिवूडमध्ये करिअर करणे सोपे नाही. परंतु, 70 च्या दशकातही हीच परिस्थिती होती. त्यावर मात करीत अमिताभ बच्चन यांनी स्वतःला सिद्ध केले.
बॉलिवूडमध्ये करिअर सुरू करण्यापासून राजकीय अपयश, "एबीसीएल" दिवाळखोरीत निघण्यापासून "कुली"च्या अपघातापर्यंत अमिताभ यांच्या आयुष्यातील संघर्षातून आपल्याला प्रेरणा मिळते. त्यांनी संकटावर केलेली मात आपल्याला बरेच काही शिकवून जाते.
त्यांच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यांनी त्यावर यशस्वीपणे केलेली मात जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...