आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh Bachchan’S Niece Naina Tie The Knot To Kunal Kapoor

अमिताभ बच्चन यांच्या पुतणीने कुणाल कपूरसोबत गुपचुप केले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- नैना बच्चन कुणाल कपूरसोबत)
मुंबई- बातमी आहे, की अमिताभ बच्चनची पुतणी नैना बच्चन आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूर यांनी लग्न केले. सांगितले जाते, की दोघे रविवारी रात्री (8 फेब्रुवारी) लग्नगाठीत अडकले. यावेळी दोन्ही कुटुंबीय उपस्थित होते. हे लग्न सेशेल्सच्या आयलँडवर झाले. सूत्रांच्या सांगण्यानुसार, कुणाल आणि नैनाने बीच वेडिंग केले आणि सेशेल्सहून परतल्यानंतर दिल्लीला वेडिंग रिसेप्शन पार्टी दिली. विशेष म्हणजे, जसे दोघांनी गुपचुप लग्न केले तसेच दोघांनी मागील वर्षी साखरपुडा केला होता.
अमिताभ बच्चन यांचे धाकटे भाऊ अजिताभ बच्चन यांची मुलगी आहे नैना-
नैना अमिताब बच्चन यांचे धाकटे भाऊ अजिताभ बच्चन यांनी धाकटी मुलगी आहे. 2007मध्ये आईच्या निधनानंतर अजिताभ, पत्नी रमोला आणि तीन मुलांसोबत (भीम, नम्रता आणि नैना) लंडनला शिफ्ट झाले होते. नैनाची आई सोशलाईट आणि महिला उद्योगपती आहे. तिचा भाऊ भीम इन्वेस्टमेंट बँकर असून बहीण आर्टिस्ट आहे. नैनासुध्दा एक इन्वेस्टमेंट बँकर आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी ती दिल्लीला शिफ्ट झाली होती, कारण तिला कुणालला पूर्ण वेळ द्यायचा होता.
कॉमन फ्रेंडकडून झाली होती ओळख-
कुणाल आणि नैना एका कॉमेन फ्रेंडच्या ओळखीने भेटले होते. बोलता-बोलता दोघांना प्रेम झाले. कुणालने एकदा सांगितले होते, 'नैना आणि मी सोबत खूप आनंदी आहोत. आमचे नाते असेच पुढे जावो.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कुणाल आणि नैनाने एकत्र घालवलेले क्षण...