आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींच्या आयुष्यात 2 ऑगस्ट हा दिवस आहे खूपच खास, जाणून घ्या का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - अमिताभ बच्चन)

बिग बींचा आज (2 ऑगस्ट) वाढदिवस आहे. आश्चर्यचकित झालात ना. अमिताभ बच्चन यांचा खरा वाढदिवस 11 ऑक्टोबरला असला तरीदेखील 2 ऑगस्ट हा दिवस बिग बींच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे. कारण याचदिवशी बिग बींना पुनर्जन्म मिळाला होता.
स्वतः अमिताभ बच्चन 2 ऑगस्ट 1982 या दिवशी त्यांना नवीन जन्म मिळाला असल्याचे म्हणतात.
कोणती जीवघेणी घटना घडली होती बिग बींसोबत...
6 जुलै 1982 रोजी 'कुली' सिनेमाच्या सेटवर घडलेल्या एका दुर्घटनेमुळे बिग बी मृत्यूच्या दाढेत गेले होते. 'कुली'च्या सेटवर अमिताभला एका प्रसंगात पुनीत इसार या कलाकाराकडून पोटात बसलेल्या ठोश्यामुळे त्यांच्या जिवावर बेतले होते. या अपघातानंतर बिग बी अनेक दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते.
पुनीत इसार या कलाकाराने मारलेल्या ठोश्यामुळे बिग बींच्या पोटातील आतडे फाटले होते. त्यामुळे त्यांना बराच रक्तस्त्रावसुद्धा झाला होता. डॉक्टरांच्या अथक परिश्रमांनंतर आणि बिग बींच्या दृढ आत्मविश्वासामुळे ते यातून तो ठणठणीतपणे बरे होऊन पुन्हा तेवढय़ाच जोशात प्रेक्षकांसमोर आले.2 ऑगस्ट 1982 रोजी बिग बींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'कुली'च्या सेटवरची छायाचित्रे...