आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजेश खन्ना यांना अमिताभ यांच्याविषयी वाटायचा हेवा, वाचा बिग बींची सुपरस्टार बनण्याची कहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: 'आनंद' सिनेमाच्या एका भावपूर्ण दृश्यात अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना)
अमिताभ बच्चन आणि राजेश खन्ना, दोघेही हिंदी फिल्मी इंडस्ट्रीचे लीजेंड्री नायक मानले जातात. एकेकाळी दोघेही सुपरस्टार होते. मात्र, कालांतराने राजेश खन्ना यांची प्रसिध्दी कमी झाली आणि अमिताभ बच्चन आजही बॉलिवूडचे एव्हरग्रीन अभिनेते आहेत. प्रसिध्दी, पैसा आणि स्टारडम यांच्यासह त्यांनी आपले आयुष्य उंचावले आहे. आज राजेश खन्ना आपल्यात नाहीत, मात्र दोघांत तुलना केली तर पैसा, स्टारडम आणि प्रसिध्दीच्या बाबतीत अमिताभ राजेश खन्ना यांच्या एक पाऊल पुढे असलेले दिसतात.
अमिताभ यांच्या यशामागे त्यांचा संघर्ष, मेहनत आणि प्रमाणिकपणा आहे, यात कोणतीच शंका नाहीये. कदाचित याच कारणाने बिग बी तारुण्यात जसे दिसायचे तसेच आजही दिसतात. प्रसिध्दी, पैसा आणि स्टारडमच्या बाबतीत अमिताभ आजसुध्दा इंडस्ट्रीमध्ये मजबूत आहेत. काळ ओलंडत असताना त्यांचे वय कोणत्याही प्रकारे त्यांच्या करिअरचा अडथळा बनत नाहीये. अमिताभ आणि राजेश खन्ना यांच्या यश-अपयाशाचा खूप खोलवर संबंध आहे.
हे असे आजच नव्हे यापूर्वीही अनेकदा झाले आहे. बॉलिवूडमध्ये एखाद्या नवोदित कलाकाराने इंडस्ट्रीत एंट्री घेतली तर त्याच्या समकालीन अभिनेत्याला त्याचे स्टारडम पचत नाही. असे म्हटले जाऊ शकते, की दिग्गज कलाकारांमध्ये प्रतिस्पर्धीचा हा भाव दिर्घकाळापासून चालत आला आहे. काही दशकापूर्वी अशीच स्पर्धा बॉलिवूडचे दोन महानायक अमिताभ आणि राजेश खन्ना यांच्यात होती. लोकांच्या सांगण्यानुसार, प्रतिस्पर्धीची भावना राजेश खन्ना यांच्याच मनात होती आणि अमिताभ त्यांच्या कामात मग्न होते.
राजेश खन्ना यांना अमिताभ बच्चन यांचा हेवा वाटत होता. कारण बॉलिवूडमध्ये नवोदित अमिताभ, खूप लवकर यशाचे मार्गाने चालले होते. त्यांना स्टारडमही तेवढेच लवकर मिळाले होते. राजेश खन्नामध्ये जे कौशल्य होते तसेच, काहीप्रमाणात अमिताभ यांच्यातही कौशल्य होते. सुरुवातीला राजेश खन्ना यांना अमिताभ यांच्याविषयी मनातून हेवा वाटत होता. परंतु नंतर तो जगजाहिर झाला आणि एक दिवस असा आला, की या मोठा स्फोटच झाला.
पुढे वाचा: बॉलिवूडमध्ये अमिताभ यांनी पाऊल ठेवले तेव्हा राजेश खन्ना होते सुपरस्टार...