आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

INTERVIEW: माझा भुतांशी कधीच सामना झाला नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महानायक अमिताभ बच्चन यंदा बरेच व्यस्त असलेले दिसत आहेत. यावर्षी त्यांचे एकापाठोपाठ सिनेमे रिलीज होणार आहेत. या सिनेमांमध्ये त्यांचा सुजीत सरकारचा 'पीहू', एका दिग्दर्शकाचा '102 नॉट आउट' आणि आर. बाल्कि यांचा नवीन सिनेमा सामील आहे.
सिनेमांव्यतिरिक्त अमिताभ यंदा जाहिरातीतसुध्दा झळकणार आहेत. ते लवकरच टीव्हीवर अनुराग कश्यपच्या दिग्दर्शनात अभिनय करताना दिसणार आहेत. यावेळी अमिताभ, अनुरागसोबत शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यामध्ये राकेश रोशनच्या 'क्रिश 3'साठी त्यांनी सुत्रधार म्हणून आवाज देण्याचे वचन दिले होते.
अमिताभ सध्या आपल्या 'भूतनाथ रिटर्न्स'च्या प्रमोशनमध्ये सर्वात जास्त बिझी आहेत. आपल्या सिनेमाला हिट बनवण्यासाठी ते ठिक-ठिकाणी जोरदार प्रमोशन करत आहेत.
'भूतनाथ रिटर्न्स' 11 एप्रिल रोजी रिजील होणार असून 2008मध्ये आलेल्या 'भूतनाथ'चा सिक्वल आहे. दिर्घकाळानंतर अमिताभ या रंजक सिनेमाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काही बातचीत झाली. त्यांना विचारलेल्या काही प्रश्नांचे उत्तर....
'भूतनाथ रिटर्न्स' करण्याचे खास कारण?
'सिनेमाची कहाणी खूप रंजक होती. नितेश तिवारीने ही कहाणी लिहीली आहे. त्यांनी 'कौन बनेगा करोपती'च्या प्रमोशनचे लेखण केले होते. बी. आर. फिल्म्सचेसुध्दा जूने संबंध होते म्हणून हा सिनेमा केला.'
भूतबाधांच्या गोष्टींवर विश्वास ठेवता?
'कहाण्यांमध्ये ऐकले आहे वास्तवात कधी बघितले नाहीये. जशा कहाण्या ऐकल्या तशाच हा सिनेमा आहे.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा कुटुंब आणि प्रमोशनमध्ये कसे वेळचे व्यवस्थापन करतात अमिताभ?