आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amitabh Jaya Bachchan Celebrate 39th Wedding Anniversary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमिताभ जयाच्या विवाहाची ‘चाळिशी’ (फोटोफिचर)

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन व जया बच्चन यांनी रविवारी लग्नाचा 39 वा वाढदिवस साजरा केला. 69 वर्षांचे बिग बी जया भादुरी यांच्यासोबत झालेल्या झटपट विवाह सोहळयाच्या आठवणीत रमून गेले होते. आपल्या ब्लॉगवर त्यांनी या आठवणी व्यक्त केल्या. ‘जंजीर’ नुकताच प्रदर्शित झाला होता.जया, मी व आमच्या काही मित्रांनी चित्रपट चांगला चालला तर लंडनवारी करण्याचे ठरवले. या निर्णयाबद्दल मी आईवडिलांना सांगितले असता, वडील म्हणाले की, त्या मुलीसोबत (जया भादुरी) तुला लंडनला फिरायला जायचे असेल, तर आधी तिच्यासोबत लग्न करावे लागेल, अन्यथा दौरा रद्द्! मी दुसर्‍याच दिवशी कुटुंबीय व जवळच्या मित्रमंडळींच्या साक्षीने जयासोबत विवाहबद्ध झालो.