आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Invitation To Amitabh, Ranbir And Rishi Kapoor For Arpita Khan’S Wedding

सलमानने अमिताभ-ऋषी यांना दिलेच नाही बहीण अर्पिताच्या लग्नाचे निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता हिचे उद्या लग्न आहे. तिचे वेडिंग रिसेप्शन येत्या 21 नोव्हेंबर रोजी मुंबईतील हॉटेल ताजमध्ये आयोजित करण्यात आले आहे. अर्पिताच्या लग्न आणि रिसेप्शन पार्टीत बी टाऊन, राजकीय आणि बिझनेस क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी हजेरी लावणार आहे. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलमानने अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांना लग्नाचे निमंत्रणच दिले नाहीये. इंड्स्ट्रीतील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
सलमानची माजी प्रेयसी ऐश्वर्या राय ही आता बच्चन कुटुंबाची सून आहे. तर त्याची आणखी एक माजी प्रेयसी कतरिना कैफ रणबीर कपूरची लिव्ह इन पार्टनर आहे. खान कुटुंबीयांना अर्पिताच्या लग्नात कुठल्याही प्रकारचा वाद नकोय. त्यामुळे त्यांनी या दोन्ही कुटुंबांना लग्नाचे निमंत्रण देणे टाळले आहे. तसे पाहता, गेल्या वर्षभरात सलमानने बच्चन कुटुंबीयांसोबतचे संबंध सुधारलेले आहेत.
अभिषेक-अमिताभसोबत झाली आहे सलमानची भेट
सलमानने काही दिवसांपूर्वी मेहबूब स्टुडिओत अमिताभ बच्चन यांची भेट घेतली होती. इतकेच नाही तर आमिरच्या मुलीच्या चॅरिटी फुटबॉल मॅचवेळी त्याने अभिषेकचे गळाभेट घेतली होती. याशिवाय कतरिनानेसुद्धा अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये सांगितले आहे, की सलमानसोबतचे तिचे नाते आजही सामान्य आहे. मात्र तरीदेखील खान कुटुंबाने अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांना दूर ठेवले आहे.
पुढे वाचा, का न बोलावता लग्नात सहभागी होणार आहेत बॉलिवूड स्टार्स आणि सलमानने कुणाकुणाला केले आहे आमंत्रित...