आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'विश्वंभर नाथ' तर कधी 'जनरल डोंग', सुपरहिट खलनायक होते अमरिश पूरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमरिश पुरी यांची विविध गेटअपमधील छायाचित्रे...पहिल्या छायाचित्रात 'विश्वंभर नाथ' इतर दोन छायाचित्रांत मौला राम)
करण जोहर आणि रोहित शेट्टी यांची जोडी 'राम-लखन' सिनेमाचा रिमेक बनवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. करणने सुभाष घई यांच्याकडून सिनेमाचे अधिकार 5 कोटींमध्ये खरेदी केले आहेत. बातम्यांनुसार, या सिनेमात सिध्दार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन राम-लखनची भूमिका साकारणार आहेत.
सुभाष घई यांच्या 'राम-लखन'मध्ये सर्व पात्र खूप मजबूत आणि उत्कृष्ट होते. जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर यांची जोडी राम-लखनच्या पात्रासाठी परेफेक्ट होती. तसेच, अमरिश पूरी विश्वंभर नाथच्या भूमिकेत खलनायकाच्या रुपात दिसले होते. आता करण जोहरच्या 'राम-लखन'मध्ये अमरिश पूरी यांच्यासारखे पात्र साकारणे कोणत्याही अभिनेत्यासाठी सोपे नाहीये. सिनेमात विश्वंभर नाथच्या भूमिकेसाठी अमरिश पूरी यांना एक डोळा जवळपास पूर्ण बंद ठेवावा लागला होता. विशेष: म्हणजे कोणत्याही मेकअपचा आधार न घेता त्यांनी एक डोळा बंद करून भूमिका निभावली.
खलनायकाचे पात्र साकारण्यात पटाईत होते अमरिश पूरी...
अमरिश पूरी यांनी 12 जानेवारी 2005 रोजी जगाचा निरोप घेतला. अमरिश पूरी यांचे सिनेमे चाहत्यांना त्यांच्या उपस्थितीची नेहमी जाणीव करून देतात. अमरिश पूरी एक खलनायक म्हणून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आजही प्रसिध्द आहेत. 'अजूबा'मध्ये वजीर-ए-आला, 'मि. इंडिया'मध्ये मोगॅम्बो, 'नगीना'मध्ये भैरो नाथ, 'तहलका'मध्ये जनरल डोंगच्या गेटअपमध्ये आजही लोक त्यांना विसलेले नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अमरिश पूरी यांनी सिनेमांमध्ये साकारलेल्या खलनायकाच्या विविध भूमिका ज्या आजही लोकांच्या स्मरणात आहेत...