आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amrita Singh Is Older Than Ex Husband Saif Ali Khan, Know Also More Celebs

पती नव्हे पत्नी आहेत वयाने मोठ्या; पतीपेक्षा अमृता 12, तर ऐश्वर्या आहे अडीच वर्षांनी मोठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः डावीकडे-अमृता सिंग आणि सैफ अली खान, उजवीकडे- अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन)

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री अमृता सिंग आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृता आज आपल्या दोन मुलांसोबत आयुष्य व्यतित करत आहे. तिचे लग्न बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत झाले होते. मात्र 13 वर्षेच दोघांचा संसार टिकू शकला. विशेष म्हणजे सैफ अमृतापेक्षा वयाने तब्बल 12 वर्षे लहान आहे. 1991 मध्ये या दोघांनी गुपचूप लग्न थाटले होते. यांच्या लग्नाला सैफच्या कुटुंबीयांचा विरोध होता. शिख कुटुंबातील असलेल्या अमृताने लग्नावेळी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता.
प्रेमात अमृता आणि सैफला आपापल्या वयाचा विसर पडला होता. अमृतापासून विभक्त झाल्यानंतर सैफने करीना कपूरसोबत दुसरा संसार थाटला आहे. विशेष म्हणजे सैफची पहिली पत्नी त्याच्यापेक्षा वयाने 12 वर्षे मोठी होती तर त्याची दुसरी पत्नी करीना त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षे लहान आहे.
सैफ आणि अमृता यांनाच केवळ प्रेमात वयाचा विसर पडला असे नाही. बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या अशा आहेत, ज्यामध्ये पतीपेक्षा त्यांच्या पत्नी वयाने मोठ्या आहेत.
चला एक नजर टाकूया अशाच काही जोडप्यांवर ज्यांच्यामध्ये पती लहान आणि पत्नी वयाने मोठ्या आहेत...