पती नव्हे पत्नी / पती नव्हे पत्नी आहेत वयाने मोठ्या; पतीपेक्षा अमृता 12, तर ऐश्वर्या आहे अडीच वर्षांनी मोठी

Feb 09,2015 02:37:00 PM IST
(छायाचित्रेः डावीकडे-अमृता सिंग आणि सैफ अली खान, उजवीकडे- अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन)

बॉलिवूडचा एक काळ गाजवणारी अभिनेत्री अमृता सिंग आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमृता आज आपल्या दोन मुलांसोबत आयुष्य व्यतित करत आहे. तिचे लग्न बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत झाले होते. मात्र 13 वर्षेच दोघांचा संसार टिकू शकला. विशेष म्हणजे सैफ अमृतापेक्षा वयाने तब्बल 12 वर्षे लहान आहे. 1991 मध्ये या दोघांनी गुपचूप लग्न थाटले होते. यांच्या लग्नाला सैफच्या कुटुंबीयांचा विरोध होता. शिख कुटुंबातील असलेल्या अमृताने लग्नावेळी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता.
प्रेमात अमृता आणि सैफला आपापल्या वयाचा विसर पडला होता. अमृतापासून विभक्त झाल्यानंतर सैफने करीना कपूरसोबत दुसरा संसार थाटला आहे. विशेष म्हणजे सैफची पहिली पत्नी त्याच्यापेक्षा वयाने 12 वर्षे मोठी होती तर त्याची दुसरी पत्नी करीना त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षे लहान आहे.
सैफ आणि अमृता यांनाच केवळ प्रेमात वयाचा विसर पडला असे नाही. बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या अशा आहेत, ज्यामध्ये पतीपेक्षा त्यांच्या पत्नी वयाने मोठ्या आहेत.
चला एक नजर टाकूया अशाच काही जोडप्यांवर ज्यांच्यामध्ये पती लहान आणि पत्नी वयाने मोठ्या आहेत...
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पती अभिषेकपेक्षा वयाने जवळजवळ अडीच वर्षांनी मोठी आहे. अभिषेक बच्चन, 39 जन्म- 5 फेब्रुवारी 1976 ऐश्वर्या राय बच्चन, 41 जन्म- 1 नोव्हेंबर, 1973 लग्न- एप्रिल 2007धनुष आणि तिची पत्नी ऐश्वर्या यांच्या वयातही दीड वर्षाचे अंतर आहे. ऐश्वर्या धनुषपेक्षा वयाने मोठी आहे. धनुष, 31 जन्म- 28 जुलै 1983 ऐश्वर्या- 33 जन्म- 1 जानेवरी 1982 लग्न- नोव्हेंबर 2004कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान पतीपेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. शिरीष कुंदर, 41 जन्म- 24 मे 1973 फराह खान, 49 जन्म- 9 जानेवरी 1965 लग्न - डिसेंबर 2004शिल्पा तिचे पती राज यांच्यापेक्षा तीन महिन्यांनी मोठी आहे. राज कुंद्रा, 38 जन्म- 9 सप्टेंबर 1975 शिल्पा शेट्टी, 39 जन्म- 8 जून 1975 लग्न - नोव्हेंबर 2009फरहान अख्तरपेक्षा त्याची पत्नी अधुना जवळजवळ सात वर्षांनी मोठी आहे. फरहान अख्तर, 40 जन्म- 9 जानेवरी 1974 अधुना अख्तर, 47 जन्म- 30 मार्च, 1967 लग्न - 2000अभिनेत्री नम्रता शिरोडकर पतीपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. महेश बाबू, 39 जन्म- 9 ऑगस्ट 1975 नम्रता शिरोडकर, 43 जन्म- 22 जानेवरी 1972 लग्न - फेब्रुवारी, 2005आयुष शर्माः इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, आयुष शर्माचे वय 28 वर्षे आहे. आयुषच्या ट्विटर अकाउंटवरुन कळतं, की त्याचा 26 ऑक्टोबरला वाढदिवस असतो. यंदाचा वाढदिवस आयुषने अर्पिता आणि काही मित्रांसोबत साजरा केला होता. वाढदिवसाची छायाचित्रेसुद्धा त्याने ट्विटरवर शेअर केली होती. अर्पिता खानः अर्पिता खानची जन्मतारीखसुद्धा कुणाला माहित नाहीये. मात्र 1981मध्ये सलीम खान यांनी अर्पिताला दत्तक घेतले होते. त्यानुसार, अर्पिताचे वय जवळजवळ 33 वर्षे आहे.मेहर जेसिया तिचे पती अर्जुनपेक्षा वयाने एक वर्षे मोठी आहे. अर्जुन रामपाल, 42 जन्म- 26 नोव्हेंबर 1972 मेहर जेसिया, 43 जन्म- 30 नोव्हेंबर 1970 लग्न - 1998अभिनेत्री जरीना वहाब तिचे पती आदित्यपेक्षा सहा वर्षांनी मोठ्या आहेत. आदित्य पांचोली, 49 जन्म- 4 जानेवरी 1965 जरीना वहाब, 55 जन्म - 17 जुलै 1959 लग्न - 1986
X

Recommended News