('सॅटर्डे संडे' या सिनेमाचा ट्रेलर बघण्यासाठी क्लिक करा...)
'सॅडर्टे संडे'मध्ये अमृता सुभाषचे बोल्ड पाऊल, एक नव्हे दोन अभिनेत्यांसह दिले किसींग सीन
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री दिवसेंदिवस बोल्ड होत आहेत. मराठीतील काही निवडक अभिनेत्री आता बिकीनी सीन्स आणि किसींग सीन्स देताना दिसत आहेत. आता या अभिनेत्रींमध्ये अमृता सुभाष हिच्या नावाचाही समावेश झाला आहे. मकरंद देशपांडे दिग्दर्शित आगामी सॅटर्डे संडे या सिनेमामुळे अभिनेत्री अमृता सुभाष चर्चेत आली आहे.
आपल्या सिनेमात नेहमी वेगळेपणा जपणा-या अमृताने सॅटर्डे संडेमध्ये चक्क किसींग सीन्स दिले आहेत. विशेष म्हणजे अमृताने एका नव्हे तर चक्क दोन अभिनेत्यांसह या सिनेमात किसींग सीन्स दिले आहेत.
या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारे नचिकेत जोशी आणि मकरंद देशपांडे यांच्यासह सिनेमात किसींग सीन्स दिले आहेत. या सिनेमात अमृता हटके भूमिकेत असून एका अभिनेत्रीची भूमिका ती या सिनेमात साकारत आहे. अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून ट्रेलरमध्ये अमृता नचिकेतसह किसींग सीन देताना दिसत आहे.
'सॅटर्डे संडे' या सिनेमात अंडरवर्ल्डला असलेला छुपा पाठिंबा, त्यापासून अनभिज्ञ सर्वसामान्य जनता, त्या मधील अनिश्चितता यांसारखे असंख्य पैलू प्रेक्षकांना पहाता येतील. अंडरवर्ल्डमध्ये कुविख्यात असलेले, टोळीला नको असलेले शार्प शूटर पोलिसांच्या डेथ लिस्टवर येतात.
सोमवारचा सूर्योदय पहायचा असेल तर आपआपसांतील दुश्मनी बाजूला ठेवून शनिवार-रविवारी एकत्र जमावे लागेल असा निरोप येतो, तो ही राज्याच्या गृहमंत्र्यांच्या पीएकडून. त्यानंतर घडणाऱ्या रणधुमाळीत नक्की काय घडतं हे सिनेमात पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
या सिनेमाचे कथालेखन दिग्दर्शक मकरंद देशपांडे यांनीच केले आहे. अॅक्शन, ड्रामा, इमोशनचा पुरेपूर मसाला असलेल्या मकरंद देशपांडे दिग्दर्शित 'सॅटर्डे संडे' सिनेमात मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, नेहा जोशी, अमृता सुभाष, नागेश भोसले, अमृता संत, असीम हट्टंगडी, नुपूर, संदेश, श्रेयस पंडीत या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. गुन्हेगारी जगताचा वेध घेणारा हा सिनेमा येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'सॅटर्डे संडे' सिनेमाची खास झलक...