आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण व्यवस्थेवर अनंत महादेवन बनवणार चित्रपट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमेश रेशमियाच्या 'द एक्सपोज'चे दिग्दर्शक अनंत महादेवन आता आपल्या आगामी चित्रपटांच्या तयारीत गुंतले आहेत. मात्र, त्यांचे हे चित्रपट मसाला एंटरटेनर्स नसतील. सध्या त्यांचा 'गौर हरी दास्तान' हा चित्रपट एका स्वातंत्र्य सैनिकाच्या वास्तव जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट जवळपास पूर्ण झाला आहे. त्यानंतर ते शिक्षण व्यवस्थेवर आधारित चित्रपट तयार करणार आहेत. हा चित्रपट भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या उणिवा आणि त्यामध्ये अभिनव प्रयोग करणार्‍या एका प्राध्यापिकेच्या आयुष्यावर असणार आहे.
'द रफ बुक' हे चित्रपटाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटातील प्रमुख भूमिकेसाठी अनंत महादेवन कोंकणा सेन शर्मा सारख्या कलावंताला संधी देण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोंकणाशी अद्याप विचारणा करण्यात आलेली नाही.