आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Andaz Apna Apna: Meet Bollywood’s Best Buddies Aamir Khan And Salman Khan

'अंदाज अपना अपना'ला 20 वर्षे पूर्ण, पाहा सल्लू-आमिरच्या मैत्रीची खास झलक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या दिवशी म्हणजे 11 एप्रिल 1994 रोजी आमिर खान आणि सलमान खान स्टारर 'अंदाज अपना अपना' हा सुपरहिट सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाच्या रिलीजला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. आमिरने आणि सलमानने साकारलेल्या अमर-प्रेम या भूमिका प्रचंड लोकप्रिय आहेत. याशिवाय तेजा, भल्ला, आनंद अकेला, रॉबर्ट, गोगो या भूमिकाही विशेष गाजल्या होत्या. सिनेमातील डायलॉग्सही प्रचंड लोकप्रिय झाले होते. इतकी वर्षे होऊनही प्रेक्षक न कंटाळता हा सिनेमा पाहावयास तयार होतात. कितीही वेळा हा सिनेमा पाहिला तरी त्यातली मजा कमी होत नाही.
सिनेमात नेहमी एकमेकांना कमी लेखणारे अमर-प्रेम अर्थातच सलमान आणि आमिर खासगी आयुष्यात मात्र खूप चांगले मित्र आहेत. सलमान अद्यापही बॉलिवूडमधील एलिजिबल बॅचलर आहे, तर आमिरने दोन संसार थाटले. शिवाय तो तीन मुलांचा वडीलही आहे.
'अंदाज अपना अपना' या सिनेमानंतर ही जोडी पुन्हा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकली नाही. मात्र कॅमे-यामागे हे दोघे मैत्री निभावताना दिसतात. अलीकडच्या काळातीलच उदाहरण घ्यायचे झाल्यास, सलमानने आपल्या बिग बॉस 6 या शोमध्ये आमिरच्या धूम 3चे प्रमोशन केले, तर आमिरनेसुद्धा सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून सलमानच्या जय होचे गोडवे गायले.
आज आम्ही तुम्हाला सलमान-आमिर स्टारर 'अंदाज अपना अपना' या गाजलेल्या सिनेमाला वीस वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने दोघांच्या मैत्रीची खास झलक छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सलमान-आमिरच्या मैत्रीची खास झलक...