आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची 'आंधळी कोशिंबीर'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नात्यांमधील घट्ट वीण, आपापसातील वाद-विवाद व त्यातून निर्माण होणारा विनोद यामुळे मराठी चित्रपट निखळ मनोरंजन करतो. ‘सुधा प्रॉडक्शन’ या संस्थेची निर्मिती असलेल्या आगामी ‘आंधळी कोशिंबीर’ या सिनेमातून रसिकांना अशाच मनोरंजनाची मेजवानी चाखायला मिळणार आहे.

अनुया म्हैसकर यांच्या ‘सुधा प्रॉडक्शन’ तर्फे निर्मित ‘आंधळी कोशिंबीर’ या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे करत आहेत. नात्यांमधील आंधळ्या कोशिंबीरीचा खेळ आपल्याला या सिनेमातून पहायला मिळणार आहे.

‘आंधळी कोशिंबीर’ या सिनेमामधून अनेक प्रसिद्ध कलाकार पडद्यावर एकत्र येत आहेत. ब-याच वर्षांनंतर अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिकेचा आस्वाद या सिनेमामधून रसिकांना घेता येणार आहे. त्यांच्यासोबत वंदना गुप्ते, अनिकेत विश्वासराव, आनंद इंगळे, प्रिया बापट, हेमंत ढोमे, मृण्मयी देशपांडे, ऋषिकेश जोशी असे अनेक दिग्गज कलाकार काम करत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कलाकारांनी या अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांनी सिनेमाविषयी काय म्हटले...