आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Ambani Will Sell A Stake In The Film Business

Exclusive: अनिल अंबानी सिनेव्यवसायातील भागीदारी विकणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - अनिल अंबानी)
दहा वर्षांपूर्वी सिनेसृष्टीत प्रवेश करणा-या अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीने आता विविध क्षेत्रातील भागीदारी कमी करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता ते केवळ सिनेनिर्मितीचे काम करणार आहे.
अनिल अंबानींची रिलायन्स कंपनी सध्या तीन क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. रिलायन्स मीडिया वर्क्स नावाने त्यांचा लॅब व पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ आहे. बिग सिनेमाज नावाने मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रिनची चेन आहे, यामध्ये एकुण 98 थिएटर आहेत. रिलायन्स बिग पिक्चर्सअंतर्गत सिनेमांची निर्मिती आणि वितरण केले जाते.
दशकभरापूर्वी अनिल यांनी या तिन्ही कंपन्या मनमोहन शेट्टींच्या अॅडलॅब्स समूहाकडून खरेदी केल्या होत्या. आता अनिल अंबानी त्यांची भागीदारी विकणार आहेत.
इंडस्ट्रीत सध्या अधिग्रहणाचा काळ सुरु आहे. पीव्हीआर मल्टीप्लेक्सने सिनेमॅक्सला, आयनॉक्सने सत्यम आणि फेम मल्टिप्लेक्सला आणि कार्निव्हल सिनेमा या दक्षिणेच्या चेनने ब्रॉडवे मल्टीप्लेक्सला आपल्या ग्रुपमध्ये घेतले आहे. अंबानींच्या बिग सिनेमाजवर सर्वांच्या नजरा असून बातचित सुरु आहे. मात्र अनिल अंबानी यांची सिनेसृष्टीशी निगडीत व्यवसायातून पाय काढण्यची इच्छा नाहीये.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, टेकओव्हर करणा-या कंपनीला रिलायन्स केवळ मॅनेजमेंट कंट्रोल देऊ इच्छिते. थिएटरमध्ये सिनेमे आता सॅटेलाइटच्या माध्यमातून दाखविले जातात. त्यामुळे आता लॅबचे काम जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनिल यांनी रिलायन्स मीडिया वर्क्सला त्यांचे प्रतिस्पर्धी प्राइम फोकससह जोडले आहे. त्यांना प्राइम फोकसमध्ये भागीदारी मिळाली आहे. ही कंपनीकडे देशातील प्रथम क्रमांकाचे पोस्ट प्रॉडक्शन स्टुडिओ आहे.