आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anil Kapoor May Produce The Debut Movie Of His Son

मुलाच्या पदार्पणासाठी अनिल स्वत: गुंतवणार सिनेमात पैसा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन 2013पासून स्वत:ला मिर्जाच्या भूमिकेत फिट करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सिनेमा सुरू होण्याच्या दोन महिन्यापूर्वीच वायकॉम18ने सिनेमातून माघार घेतली आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की नवीन कलाकारावर 35 कोटी रुपये लावणे फायद्याचे ठरणार नाही.
राकेश ओमप्रकाश मेहरा हे महागडे दिग्दर्शक म्हणून ओळखले जाते. फरहान अख्तरच्या स्टारडमपेक्षा 'भाग मिल्खा भाग'चे बजेट जास्त होते. परंतु वायकॉम18ने पटकथेवर विश्वास ठेवला होता. त्यानंतर हा सिनेमा 100 कोटींच्या कमाईने हिट ठरला. परंतु अक्षय कुमार अभिनीत 'बॉस' सिनेमा अपयशानंतर वायकॉम18ने बजेटच्या बाबतीत नियम घातले आहेत.
आता ते सिनेमाचे स्टारकास्ट आणि कहाणी यांच्यावर विश्वास ठेऊन पैसा लावणार आहेत. हर्षवर्धन नवोदीत कलाकार आहे त्यामुळे 35 कोटी लावून 'मिर्जा साहिबा' बनवण्यासाठी कंपनी तयार होत नाहीये.
जुलैमध्ये सुरू होणा-या या सिनेमावर शेवटचा निर्णय आणि विचार करण्यासाठी वायकॉम18ने दहा दिवसांचा कालावधी घेतला आहे. परंतु आता या सर्वांमध्येच सुपरहिरो 'पापा' अनिल कपूरची एंट्री झाली आहे. तीही 'प्लान बी'सह.
अनिल आपल्या करिअरमध्ये सक्षम योजनेच्या बळावर सुपस्टार झाला आहे आणि आजही तो तितकाच अ‍ॅक्टीव्ह आहे. पापा अनिलने निर्णय घेतला आहे, की वायकॉम18ने जर साथ सोडली तर तो स्वत: हा सिनेमा निर्मित करणार आहे.
सुत्रांच्या सांगण्यानुसार, अनिल याव्यतिरिक्त फॉक्स स्टार स्टुडिओ, इरोस इंटरनॅशनल आणि यूटीव्ही/डिज्नीपैकी एकाचे नाव स्टुडिओच्या बोर्डवर आणू शकतो. सध्या तीन्ही कंपनींसोबत बातचीत चालू आहे. या तीघांपैकी यूटीव्ही/डिज्नी सिनेमाशी जोडण्याची दाट शक्यता आहे.

या स्टुडिओने राकेश ओमप्रकाश मेहरासोबत गुंतागुंतीचा विषय असलेले 'रंग दे बसंती' आणि 'दिल्ली 6' सिनेमे बनवले होते. जर काहीच होऊ शकले नाही तर अनिल स्वत:च्या जबाबदारीवर हा सिनेमा निर्मित करणार आहे. त्यांनी जुलैमध्ये सुरू होणारी शुटिंग सप्टेंबर महिन्यात सुरू करण्याचा निर्णय अनिलने घेतला आहे.