आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anjali Ranadive Perform For Narendra Modi At Madison Square Garden

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: मोदींसाठी पॉप सिंगरने केले परफॉर्म; जाणून घ्या, कोण आहे अंजली रणदिवे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - न्यूयॉर्कमध्ये मेडिसन स्क्वेअर गार्डनवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी अनेक भारतीय कलाकारांनी परफॉर्मन्स दिला. या सर्वांमध्ये भारतीय वंशाच्या मराठमोळ्या अंजली रणदिवे हिचा कार्यक्रम सर्वात लक्षवेधी ठरला. अंजली भारतीय वंशाची अमेरिकन पॉप सिंगर आहे. तिने या कार्यकर्मात अमेरिकेचे राष्ट्रगीत गायिले.
'वी टर्न अप' या गीताने अंजलीला अमेरिकेत प्रसिद्धी मिळवून दिली आहे. अमेरिकेच्या पॉप इंडस्ट्रीमध्ये तिचा बोलबाला आहे. तिने युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधून मरिन अॅकोलॉजीमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
रविवारी अंजलीने मेडिसन स्क्वेअर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी गीत गायिले. अंजलीचे वडील विवेक रणदिवे हे अमेरिकेतील उद्योगपती आहेत. अमेरिकेत मोदींच्या कार्यक्रमाच्या आयोजनात जे मोजके लोक होते त्यापैकी ते एक आहेत.
कोण आहेत विवेक रणदिवे
विवेक रणदिवे हे टिबको कंपनीनचे सीईओ आहेत. भारतीय वंशाचे ते अमेरिकन उद्योगपती आहेत. त्यांचा जन्म मुंबईत झाला. मुळचे हे मराठी कुटुंब 80 च्या दशकात अमेरिकेत स्थायिक झाले. विवेक रणदिवे यांनी मॅसच्यूट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मास्टर डिग्री मिळविली. त्यानंतर त्यांनी हॉर्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले. वॉल स्ट्रिटचे डिजिटिलायझेशन करण्यासाठी विवेक रणदिवे अमेरिकेत ओळखले जातात.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, अंजली रणदिवेची निवडक छायाचित्रे
(अमेरिकेची पॉप सिंगर अंजली रणदिवे)